‘दृश्यम २’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, २०१४ साली आलेल्या या चित्रपटाच्या पहिल्या भागाला लोक आजही विसरले नाहीत. या चित्रपटात अजय देवगण एक सामान्य माणूस दाखवला असून तब्बू एका तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. आता पुन्हा एकदा ती असाच भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तिचा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेता म्हणून अजय देवगण उत्तम आहेच मात्र आता तो दिग्दर्शनात उतरला आहे. त्याचा आगामी ‘भोला’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात तब्बू एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. नुकतंच तिच्या लूकचे मोशन पोस्टर व्हायरल झाले आहे. तब्बूचा हा तिसरा चित्रपट आहे, ज्यामध्ये ती पुन्हा एकदा पोलीस महिला बनली आहे. तो असाच टाईपकास्ट होतोय का? कारण हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. तब्बूचा लूक आऊट होताच लोकांना एकच प्रश्न पडतो की तब्बू सतत तिची भूमिका का करत आहे? अशी काही जणांची प्रतिक्रिया आहे.
‘भोला’ हा तमिळ ब्लॉकबस्टर ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले होते. हा चित्रपट थरारपट असणार आहे. भोला ही एक वडिलांची गोष्ट आहे जे आपल्या तरुण मुलीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक माणसांशी लढतात. हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.