पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अंदमान-निकोबार बेटावरील त्यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं उद्घाटन केलं. याबरोबरच अंदमान-निकोबारवरील २१ बेटांचं नामकरणही पंतप्रधान मोदींनी केलं आहे. या २१ बेटांना आता परमवीर चक्र प्राप्त विजेत्या सैनिकांची नावे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची घोषणा आज मोदिंनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान मोदींच्या या निर्णयामुळे आता अंदमान-निकोबारवरील २१ बेटे परमवीर चक्र विजेत्या सैनिकांच्या नावाने ओळखली जाणार आहेत. मोदींच्या या निर्णयाचं बॉलिवूड कलाकारांनी कौतुक केलं आहे. अभिनेता अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा व सुनील शेट्टीने ट्वीट करत मोदींचे आभार मानले आहेत.

“कॅप्टन मनोज कुमार पांडे (परमवीर चक्र) यांचं नाव बेटाला देण्यात येणार आहे. सैनिकांनी देशासाठी दिलेलं बलिदान आपल्या पुढच्या पिढीला प्रेरित करेल, हे या निर्णयामुळे निश्चित झालं आहे. धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी”, असं अजय देवगणने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> परमवीर चक्र विजेत्यांच्या नावाने ओळखली जाणार अंदमान-निकोबारची ‘ही’ २१ बेटे; PM मोदींनी केलं नामकरण; म्हणाले…

सिद्धार्थ मल्होत्राने ट्वीट करत “अंदमान-निकोबारवरील एका बेटाला कॅप्टन विक्रम बत्रा यांचं नाव देण्यात असल्याची बातमी ऐकताच माझ्या अंगावर शहारा आला. मला चित्रपटात त्यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे. नरेंद्र मोदींच्या या निर्णयामुळे शेरशाह अमर राहतील”,असं म्हटलं आहे.

हेही पाहा>>Photos: अथिया शेट्टीच्या वाढदिवशी के.एल.राहुलने दिलेली प्रेमाची कबुली, जाणून घ्या त्यांची फिल्मी लव्हस्टोरी

“अंदमान-निकोबारवरील बेटांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल आभार. परमवीर चक्र प्राप्त सैनिक आपल्या देशाचे खरे हिरो आहेत”, असं ट्वीट सुनील शेट्टी यांनी केलं आहे.

या’ २१ परमवीर चक्र विजेत्या सैनिकांची नावं बेटांना देण्यात आली…

मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि मानद कॅप्टन (तत्कालीन लान्स नाईक) करम सिंग, एमएम, सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग, कॅप्टन जी. एस. सलारिया, लेफ्टनंट कर्नल (तत्कालीन मेजर) धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, सीक्यूएमएच. अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखोन, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मेजर कुमार बत्रा, लेफ्टनंट कुमार बत्रा (सुभेदार) तत्कालीन रायफलमन) संजय कुमार आणि सुभेदार मेजर निवृत्त (मानद कॅप्टन) ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव या परमवीर चक्र विजेत्यांची नावे अंदमान आणि निकोबारमधील बेटांना देण्यात आली आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgan siddharth mahlotra suni shetty praises pm narendra modi decision naming andman nikobar island 21 paramveer chakra winners kak