अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू असतानाच अजयने त्याच्या आणखीन एका आगामी चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. अजयच्या ‘भोला’ या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरने सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.

अजय देवगण ‘दृश्यम २’ प्रमाणेच त्याच्या ‘भोला’ या चित्रपटसाठीही चर्चेत होता. हा चित्रपट त्याने स्वतः दिग्दर्शित केला आहे. यात त्याच्याबरोबर प्रमुख भूमिकेत अभिनेत्री तब्बू काम करताना दिसणार आहे. यापूर्वी या दोघांनी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तसंच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केल्यावर तब्बूने अजयसाठी एक खास पोस्टही लिहिली होती. त्यामुळे या चित्रपटाची खूप आतुरता होती. आता अखेर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
kiran gaikwad and vaishnavi kalyankar mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘देवमाणूस’ फेम अभिनेता बोहल्यावर चढणार; होणारी पत्नी आहे लोकप्रिय अभिनेत्री, पाहा व्हिडीओ
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Savlyachi Janu Savli
Video: “आई मला वाचव…”, सारंगचा जीव संकटात? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत पुढे काय होणार? वाचा…

आणखी वाचा : “प्रेक्षक खूप हुशार झालेत आणि…” बॉलिवूड चित्रपट अयशस्वी होण्याबद्दल अजय देवगणचं मोठं वक्तव्य

या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात सरस्वती नावाच्या अनाथाश्रमापासून सुरू होते. या आश्रमातील एका मुलीला कोणीतरी भेटायला येणार असं तिला सांगण्यात येतं. आपल्याला कोण भेटायला येऊ शकतं याचा ती खूप विचार करते. त्याचवेळी अजय देवगणची या चित्रपटातील झलक पहायला मिळते. तो तुरुंगात कैद असलेला दाखवला आहे.

हेही वाचा : तब्बूने अजय देवगणसाठी केलेल्या खास पोस्टने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, म्हणाली….

या टीझरमध्ये त्याचा चेहरा दिसत नसला तरी तो अजयच आहे हे ओळखू येत आहे. सस्पेन्स आणि अॅक्शन भरलेला असा या चित्रपटाचा टीझर आहे. या टीझरमध्ये धमकेदार अॅक्शन सीन्सही पहायला मिळत आहेत. ‘कौन है वो, जिसको पता है वो खुद लापता है,’ हा या टीझरमधील डायलॉग या टीझरला खूप समर्पक वाटत आहे. सध्या हा टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Story img Loader