रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील आगामी चित्रपट ‘सिंघम अगेन’ची जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून या चित्रपटात कलाकारांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. अजय देवगण आणि करीना कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेतच. शिवाय ‘सूर्यवंशी’ आणि ‘सिंबा’ म्हणजेच अक्षय कुमार व रणवीर सिंहसुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. मध्यंतरी या चित्रपटाचा एक जबरदस्त अॅक्शन सीन शूट झाल्याचं करीनाने तिच्या पोस्टमध्ये शेअर केलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकंच नव्हे तर या चित्रपटात आणखी बरीच सरप्राइजेस आहेत. दीपिका पदूकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूरसुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून या कॉप युनिव्हर्सशी जोडले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील दीपिका आणि टायगरचा धासु लुक समोर आला होता. आता नुकतंच यातील रणवीर सिंहचा म्हणजेच सिंबाचा लुक समोर आला आहे. या लुकमुळे ‘सिंघम अगेन’ची कथा रामायणावर बेतलेली असू शकते अशी चर्चा होत आहे.

आणखी वाचा : पती विपुल शाह यांच्या ‘द केरला स्टोरी’विषयी शेफाली शाह यांचं वक्तव्य; म्हणाल्या, “ही धर्माची गोष्ट…”

‘पिंकव्हीला’च्या एका पत्रकाराने जून महिन्यात केलेल्या ट्वीटमध्येच याची कल्पना दिली होती. २०२४ मध्ये एका बिग बजेट चित्रपटात रामायणाचे संदर्भ आढळतील असं ट्वीट करत त्यांनी माहीती दिली होती. रणवीर सिंहचे नुकतेच आलेले पोस्टर आणि त्यातील मागे दिसणारी बजरंग बलीचे चित्र पाहून आता बऱ्याच नेटकऱ्यांनी अंदाज वर्तवला आहे की ‘राजनीति’ चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे महाभारताचे संदर्भ घेतले होते तसेच ‘सिंघम अगेन’मध्येही रामायणाचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतील.

काहींनी यामागील थीअरी स्पष्ट करत सांगितलं की अजय देवगण अक्षय कुमार यांच्या प्रभू श्रीराम व लक्ष्मण यांच्यासारख्या भूमिका असतील. रणवीर सिंहची भूमिका हनुमानापासून प्रेरित असेल अशी चर्चा त्याच्या पोस्टरमुळे सुरू झाली. तर अर्जुन कपूर व टायगर श्रॉफ हे रावण व मेघनाद यांच्यासारख्या भूमिकेत असतील. अर्जुन कपूर या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे त्यामुळे हे तर्क लावले जात आहेत. अद्याप चित्रपटाच्या रामायणाशी असलेल्या कनेक्शनबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नसल्याने या सगळ्या सांगीवांगी गोष्टीच आहेत.

‘सिंघम अगेन’चं चित्रीकरण सुरू झालं असून मुंबईचा यश राज स्टुडिओ आणि हैद्राबादमधील चित्रीकरण पूर्ण झाले आहे. तसेच आता लवकरच या चित्रपटाचा जबरदस्त क्लायमॅक्स चित्रित होणार आहे ज्यावर तब्बल २५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘सिंघम अगेन’ प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’सुद्धा येणार आहे. अद्याप कोणत्याही निर्मात्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याबद्दल भाष्य केलेलं नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgan starrer singham again has reference from ramayana avn