बॉक्स ऑफिसवर सध्या सुरज बडजात्या यांच्या ‘उंचाई’ या चित्रपटाची चांगलीच चलती आहे. दिवसागणिक या चित्रपटाच्या कमाईची आकड्यात वाढ होत आहे. हॉलिवूडपट आणि एक दाक्षिणात्य चित्रपटाबरोबर प्रदर्शित होऊनही प्रेक्षक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी यांच्या ‘उंचाई’ला पसंती दर्शवत आहेत.
आता मात्र उद्या बॉक्स ऑफिसवर २ कलाकारांच्या चित्रपटात घमासान पाहायला मिळणार आहे. बच्चन यांचा ‘उंचाई’ आणि अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हे दोनही चित्रपट उद्या आमने सामने येणार आहेत. ‘उंचाई’ने बॉक्स ऑफिसव स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे, पण उद्या प्रदर्शित होणाऱ्या अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ या चित्रपटाचीही चांगलीच हवा आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.
चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी आज उंचाईचा बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे शेअर केले आणि ट्वीटमध्ये लिहिले की “चित्रपट या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर उत्तम व्यवसाय करत आहे, मंगळवारी याने १.६६ कोटी रुपयांची कमाई केली. शिवाय शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी अजय देवगणच्या ‘दृष्यम २’ शी टक्कर झाल्यावर ‘उंचाई’च्या कमाईवर थोडा परिणाम होऊ शकतो.”
अजय देवगण, तब्बू आणि अक्षय खन्ना स्टारर ‘दृष्यम २’ १८ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट मूळ मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. अक्षय खन्ना हा कलाकारांमध्ये नवीन भूमिकेत दिसणार आहे. २ तास २२ मिनिटांचा रनटाइम असलेल्या या चित्रपटाला सेन्सॉरकडून UA प्रमाणपत्र मिळाले आहे. प्रेक्षक या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.