बॉलिवूडचा ‘सिंघम’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. आगामी चित्रपट ‘थँक गॉड’मध्ये तो चित्रगुप्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण या भूमिकेमुळे तो अडचणीत आला आहे. या चित्रपटात अजय देवगणसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि राकुल प्रीतची महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पण या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यासाठी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणारे याचिकाकर्ते वकील मोहन लाल शर्मा म्हणाले, “या चित्रपटातून चित्रगुप्ताचा अपमान करण्यात आला आहे. यामुळे कायस्थ समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.” तर कायस्थ समाजाचं म्हणणं आहे की ते चित्रगुप्ताची पूजा करतात आणि या चित्रपटातून त्यांचा अपमान करण्यात आला आहे. हे सहन केलं जाणार नाही. याशिवाय न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये समाजावर पडणाऱ्या प्रभावाबद्दलही बोललं गेलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास देशातील शांतता आणि समजूतदारपणा यावर परिणाम होऊ शकतो.

आणखी वाचा- ‘थँक गॉड’ आणि ‘रामसेतू’ एकाच दिवशी होणार प्रदर्शित; चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला…

दरम्यान कायस्थ समाजासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सक्सेना यांनी या चित्रपटाबाबत अजय देवगण आणि चित्रपट निर्माते टी-सीरीजविरोधात यापूर्वीच तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, ज्यामध्ये चित्रगुप्त आधुनिक अवतारात दाखवण्यात आला आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित ‘थँक गॉड’ हा कॉमेडी चित्रपट २४ ऑक्टोबर रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader