Bholaa Box Office Collection Day 4: अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘भोला’ चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. ‘दृश्यम २ ‘च्या यशानंतर पुन्हा एकदा अजयच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. ‘भोला’ चित्रपट हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. पण दुसऱ्या दिवशी त्याच्या कमाईत घट नोंदवण्यात आली होती.
विवाहित चित्रपट निर्मात्याच्या प्रेमात पडलेल्या जया प्रदा; दोघांनी गुपचूप लग्नही केलं, पण…
शनिवार व रविवार या वीकेंडच्या दिवसात मात्र चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ दिसून आली. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने १२ कोटी तर चौथ्या दिवशी चित्रपटाने १४ कोटी रुपयांची कमाई केली. अशा रितीने या चित्रपटाने आतापर्यंत ४४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शुक्रवारी आयपीएलची सुरुवात झाली, त्यादिवशी चित्रपटाने फक्त ७ कोटी रुपये कमावले होते, पण वीकेंडला मात्र कमाईत वाढ नोंदवण्यात आली. आज सोमवारी ३ एप्रिल रोजी चित्रपट ५० कोटींचा आकडा गाठेल, असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
Indian Idol 13: ऋषी सिंह ठरला ‘इंडियन आयडला १३’चा विजेता, दत्तक लेकाने उंचावली आई-वडिलांची मान
दरम्यान, भोला हा तामिळ चित्रपटचा अधिकृत हिंदी रिमेक आहे, तामिळ चित्रपटात कार्तीची मुख्य भूमिका होती, ती भूमिका या चित्रपटात अजय देवगणने साकारली आहे. अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त, या चित्रपटात दीपक डोबरियाल, संजय मिश्रा आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.