Bholaa Box Office Collection Day 5 : अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘भोला’ चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. ‘दृश्यम २ ‘च्या यशानंतर पुन्हा एकदा अजयच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. ‘भोला’ चित्रपट हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. त्यामुळे या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर होईल की नाही, अशी चर्चा होती. चित्रपटाने पहिल्या दिवशी १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. पण दुसऱ्या दिवशी त्याच्या कमाईत घट नोंदवण्यात आली होती. आता चित्रपटाच्या पाचव्या दिवशी म्हणजे सोमवार (3 एप्रिल) देखील या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे.

हेही वाचा- ‘भोला’च्या कमाईवरुन अभिनेत्याने उडवली अजय देवगणची खिल्ली, म्हणाला, “संपूर्ण बॉलिवूडला…”

Emergency Box office collection day 19 Kangana Ranaut movie earned only 0.05 crore on Tuesday
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ने १९व्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई, अजूनपर्यंत बजेटचा आकडा ओलांडू शकला नाही चित्रपट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
allu arjun starr Pushpa 2 The Rule movie box office collection day 61
ओटीटी रिलीजचा ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या कमाईवर मोठा फटका, ६१व्या दिवशी फक्त ‘इतके’ कमावले
Junaid khan says he releasing film on youtube is best
थिएटर व OTT च्या वादावर आमिर खानचा मुलगा म्हणाला, “चित्रपट युट्यूबवर मोफत…”
Deva Advance Booking Day 1
शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग सुरू; पहिल्याच दिवशी केली ‘इतकी’ कमाई
A six days old baby girl sold by her parents for Rs 90 000 in Ulhasnagar
उल्हासनगरमध्ये सहा दिवसाच्या बाळाची आई, वडिलांकडून ९० हजार रूपयांना विक्री
Fussclass Dabhade Box Office Collection
हेमंत ढोमेच्या ‘फसक्लास दाभाडे’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात! ३ दिवसांत कमावले तब्बल…; म्हणाला, “तिकीटबारीवर…”
Mamta Kulkarni net worth
५२ व्या वर्षी संन्यास घेणाऱ्या मराठमोळ्या ममता कुलकर्णीची संपत्ती किती? वाचा…

शनिवार व रविवार या वीकेंडच्या दिवसात मात्र चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ दिसून आली. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने १२ कोटी तर चौथ्या दिवशी चित्रपटाने १४ कोटी रुपयांची कमाई केली. अशा रितीने या चित्रपटाने आतापर्यंत ४४ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. शुक्रवारी आयपीएलची सुरुवात झाली, त्यादिवशी चित्रपटाने फक्त ७ कोटी रुपये कमावले होते, पण वीकेंडला मात्र कमाईत वाढ नोंदवण्यात आली. सोमवारी या चित्रपटानं ४.५० कोटींची कमाई केली आहे. पाच दिवसात या चित्रपटानं ४८.७८ कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच ५० कोटींचा आकडा गाठेल, असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.

हेही वाचा- “भारतात राहणे म्हणजे..” स्वरा भास्करच्या ‘त्या’ ट्वीटवर नेटकरी भडकले; म्हणाले, “पाकिस्तानात…”

दरम्यान, भोला हा तामिळ चित्रपटचा अधिकृत हिंदी रिमेक आहे, तामिळ चित्रपटात कार्तीची मुख्य भूमिका होती, ती भूमिका या चित्रपटात अजय देवगणने साकारली आहे. अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त, या चित्रपटात दीपक डोबरियाल, संजय मिश्रा आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Story img Loader