Bholaa Box Office Collection Day 6 : अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘भोला’ चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. ‘दृश्यम २ ‘च्या यशानंतर पुन्हा एकदा अजयच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. ‘भोला’ चित्रपट हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. त्यामुळे या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर होईल की नाही, अशी चर्चा होती. चित्रपटाने पहिल्या दिवशी १० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. पण दुसऱ्या दिवशी त्याच्या कमाईत घट नोंदवण्यात आली होती. चित्रपटाने पाचव्या दिवशी ५० कोटींचा आकडा पार केला आहे.
हेही वाचा- इंडस्ट्रीमध्ये जास्त काम का करत नाहीस? मलायका अरोरा म्हणते, “लोक मला…”
वीकेंडच्या दिवसात मात्र चित्रपटाच्या कमाईत पुन्हा वाढ दिसून आली. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने १२ कोटी तर चौथ्या दिवशी चित्रपटाने १४ कोटी रुपयांची कमाई केली. पण आता चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. शुक्रवारी आयपीएलची सुरुवात झाली, त्यादिवशी चित्रपटाने फक्त ७ कोटी रुपये कमावले होते. सोमवारी या चित्रपटानं ४.५० कोटींची कमाई केली आहे. पाच दिवसात या चित्रपटानं ४८.७८ कोटींची कमाई केली होती. आता सहाव्या दिवशी चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला आहे. आत्तापर्यंत चित्रपटाने एकूण ५३.२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
हेही वाचा- “मी दिल्लीत…”; दिव्या भारतीच्या मृत्यूबाबत शाहरुख खानचा मोठा खुलासा
‘भोला’चं बजेट १२५ कोटी असल्याचं स्पष्ट झालं आहे त्यामुळे या चित्रपटाने अधिक कमाई करणं अपेक्षित आहे. याबरोबरच नानीच्या ‘दसरा’ या दाक्षिणात्य चित्रपटसुद्धा भोलाबरोबरच प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे अजयच्या ‘भोला’मध्ये अजय देवगण, तबू, दीपक डोबरियाल, गजराज राव, संजय मिश्रा हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.