२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अजय देवगणच्या ‘दृश्यम’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचे चाहते या चित्रपटाच्या सिक्वेलची खूप आतुरतेने वाट पाहत होते. काही दिवसांपूर्वी ‘दृश्यम २’ची घोषणा करण्यात आली. चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये अक्षय खन्ना जोडला गेला आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दृश्यम २’ व्यतिरिक्त अजय ‘भोला’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तो या चित्रपटाचा दिग्दर्शक देखील आहे.

‘भोला’ हा दाक्षिणात्य सुपरस्टार कार्थी याच्या ‘कैथी’ (Kaithi) या सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘कैथी’ हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘भोला’ आणि ‘दृश्यम २’ या दोन्ही चित्रपटांमध्ये तब्बूने अजयसह काम केले आहे. तो सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. त्याने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये तब्बूच्या कपाळाला जखम झाली असून तो रुमालाने ती जखम साफ करत असल्याचे दिसत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

आणखी वाचा – …अन् मध्यरात्रीच बाथरुममध्ये एकत्र गेले शालीन भानोत व टीना दत्ता, ‘त्या’ कृत्यानंतर घरातील सदस्यांमध्येही रंगली चर्चा

पण पहिल्या काही सेकंदांमध्ये कपाळाला जखम झाल्याने कळवळणारी तब्बू पुढे हसायला लागते. यामुळे तिच्या कपाळावरची जखम खोटी की खरी असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काल तिचा वाढदिवस होता. या निमित्ताने अजयने हा व्हिडीओ शेअर केला होता. “कशाला घाबरत आहेस? वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले होते. तसेच त्याने ‘प्यासा’ चित्रपटामधील ‘सर जो तेरा चकराए’ हे गाणं व्हिडीओला जोडले आहे.

आणखी वाचा – “आम्ही भेटायचो, कारण…”; करण मेहराशी अफेअरच्या आरोपांबद्दल सुश्मिता सेनच्या वहिनीचं स्पष्टीकरण

अजय आणि तब्बू यांनी ‘विजयपथ’, ‘हकीकत’, ‘तक्षक’, ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेंन’, ‘दे दे प्यार दे’ अशा चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्यामध्ये खूप घनिष्ठ मैत्री आहे. एका मुलाखतीमध्ये तिने ‘मी अजयमुळे आज सिंगल आहे’, असे वक्तव्य केले होते. या मुलाखतीदरम्यान ती म्हणाली होती, “तरुणपणी अजय आणि समीर (तब्बूचा भाऊ) माझ्यावर पाळत ठेवायचे. एखादा मुलगा माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला धडा शिकवायचे. त्यामुळे माझ्याशी बोलायची हिम्मत कोणी केली नाही आणि मी सिंगल राहिले.”

Story img Loader