अभिनेता अजय देवगणची ऑनस्क्रीन लेक आई होणार आहे आणि ‘टार्झन’ चित्रपटात अजयच्या मुलाची भूमिका करणारा वत्सल शेठ दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. ‘दृश्यम’ चित्रपटांमध्ये अजय देवगणच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता पुन्हा गरोदर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध अभिनेत्री इशिता दत्ता आणि अभिनेता वत्सल सेठ सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. हे दोघेही लवकरच दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत, अशी चर्चा मागील खूप दिवसांपासून सुरू होती. अखेर या चर्चांवर वत्सलने मौन सोडलं आहे. इशिता आणि वत्सल दोघेही दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहेत. आणि आपल्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी ते खूप उत्सुक आहेत.

इशिता व वत्सल यांना एक मुलगा आहे. त्याचं नाव वायू आहे. त्याचा जन्म २०२३ मध्ये झाला होता. आता इशिता पुन्हा गरोदर आहे. वत्सलने लवकरच तो दुसऱ्यांदा बाबा होणार आहे, अशी माहिती दिली. इशिताने त्याला दुसऱ्या प्रेग्नेन्सीबद्दल कशी माहिती दिली आणि ते ऐकल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय होती, हे वत्सलने सांगितलं.

इशिता दत्ता वत्सलला ‘अशी’ दिलेली गुड न्यूज

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, वत्सल सेठ म्हणाला, “हे माझ्यासाठी सरप्राईज होते आणि या सरप्राईजने मी खूप खूश आहे. जेव्हा इशिताने मला प्रेग्नेंसीबद्दल सांगितलं ‘Ohh Waah’ अशी माझी प्रतिक्रिया होती. मला काहीच कळत नव्हतं. बाबा म्हणून माझ्यासाठी ही खूप मोठी बातमी होती, त्यामुळे मला खूप आनंद झाला. इशिता आमच्या खोलीत आली आणि तिने मला ही बातमी दिली होती.”

“मला आठवतंय इशिताने त्या दिवसांमध्ये सांगितलं, जेव्हा वायू खूप चिडचिड करायचा. आमच्या कुटुंबात नवीन सदस्य जुलैमध्ये येणार आहे. आम्ही लोकांना याबद्दल सांगण्यापूर्वी थोडा वेळ घेतला. आम्ही यावर चर्चा केली, कारण दुसरी गर्भधारणा निश्चितपणे पहिल्यापेक्षा खूप वेगळी असते,” असं वत्सलने नमूद केलं.

इशिता दत्ता काय म्हणाली?

ई-टाइम्सशी बोलताना इशिता म्हणाली, “यावेळी आम्ही जास्त आनंदी आणि उत्साही आहोत. वायूसोबत प्रत्येक अनुभव नवीन होता. मला आठवतं की मी अनेकदा डॉक्टरांकडे जायचे, पण यावेळी माझ्या डॉक्टरांना मी जास्त वेळा फोन करत नाही याचं मलाच आश्चर्य वाटतंय. माझे आईवडील आमच्याबरोबर राहायला आले आहेत, त्यामुळे माझ्या घरी चांगली सपोर्ट सिस्टीम आहे.”

इशिता व वत्सल यांच्या नात्याबद्दल बोलायचं झाल्यास दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०१७ साली लग्न केलं होतं. लग्नानंतर सहा वर्षांनी त्यांनी पहिल्या बाळाचं स्वागत केलं होतं. आता इशिता लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे.