अजय देवगण बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आत्तापर्यंत त्याने अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्यावर्षी त्याचे भोला, चाणक्य सारखे चित्रपट प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी चांगली कमाई केली होती. आता लवकरच त्याचा ‘शैतान’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्यंतरी याचा एक छोटासा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता नुकताच या चित्रपटाचा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

२ मिनिटं २६ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये आपल्याला एक थरकाप उडवणारं नाट्य पाहायला मिळत आहे याबरोबरच एक सस्पेन्सदेखील पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचे दोन दिग्गज अभिनेते अजय देवगण आणि आर. माधवन हे दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करत आहेत. ट्रेलरमध्ये आर. माधवनचं पात्र हे अजय देवगणवर चांगलंच भारी पडताना दिसत आहे.

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

आणखी वाचा : ‘बिग बॉस १६’ फेम शिव ठाकरे व अब्दु रोजिक यांना ‘ईडी’चे समन्स; ड्रग माफिया व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी झाली चौकशी

काळी जादू, वशीकरण अशा भयानक गोष्टीवर या चित्रपटाचं कथानक बेतलेलं आहे. १० मिनिटांसाठी अजय देवगणच्या घरात शिरलेला माधवन कशा रीतीन अजय देवगणच्या मुलीवर काळी जादू करून तिला आपल्या तालावर नाचवतो आणि हळूहळू ही गोष्ट हे भयानक, हिंस्त्र असं वळण घेऊन लागते याची झलक आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. आर. माधवनने प्रथमच अशी भूमिका साकारली आहे.

माधवनचा भयानक लूक आणि अजय देवगणची अदाकारी यासाठी प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यास फार उत्सुक आहेत अन् त्या ट्रेलरने त्यांची उत्सुकता आणखी चाळवली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बेहल यांनी केलं आहे. ‘शैतान’ हा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुजराती चित्रपट ‘वश’ चित्रपटाचा रिमेक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणबरोबर आर माधवन, साऊथची सुपरस्टार ज्योतिका यांच्याही प्रमुख भूमिका आहे.

Story img Loader