बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट उद्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडायला सुरुवात केली आहे. अडव्हान्स बुकिंगमधून तब्बल २४ कोटींची कमाई शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने केली आहे.

शाहरुख खानच्या ‘पठाण’ची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. ‘पठाण’च्या प्रदर्शनाआधीच्या रेकॉर्ड ब्रेक कमाईवर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने प्रतिक्रिया दिली आहे. अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला. ‘भोला’च्या टीझर कार्यक्रमादरम्यान अजय देवगणने पठाणबाबत भाष्य केलं. “कोणताही प्रदर्शित होणारा चित्रपट सुपरहिट व्हावा, अशीच माझी इच्छा आहे. शेवटी मनोरंजन विश्व एकच आहे. ‘पठाण’ चित्रपटासारखं अडव्हान्स बुकिंग आजपर्यंत कोणत्याच चित्रपटाचं झालेलं नाही. त्यामुळे मी स्वत: खूश आहे”, असं तो म्हणाला.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”

हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’ची बीडमध्येही क्रेझ, चाहत्याने ट्वीट केलेला फोटो पाहून अभिनेता म्हणाला…

अजय देवगणचा हा व्हिडीओ शाहरुख खानने त्याच्या ट्वीटवरुन शेअर केला आहे. “अजय आत्तापर्यंत नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. मी व माझ्या कुटुंबियांप्रती त्याने नेहमीच प्रेम व्यक्त केलं आहे. अजय देवगण एक उत्कृष्ट अभिनेता व व्यक्ती आहे”, असं शाहरुख खानने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “घर घेऊन देण्याचं वचन दिलेलं”, नोरा फतेहीच्या आरोपांवर सुकेश चंद्रशेखरचा मोठा खुलासा, म्हणाला “तिने माझ्याकडून…”

शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटातून तब्बल चार वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दीपिका पदुकोण व जॉन अब्राहमही मुख्य भूमिकेत आहे.

Story img Loader