Bollywood Actor Ajay Devgn : बॉलीवूडचा ‘सिंघम’ अर्थात अजय देवगण सध्या ‘औरों में कहां दम था’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अजय व तब्बूची एव्हरग्रीन जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने या दोघांनी ‘लल्लनटॉप’च्या मुलाखतीला उपस्थिती लावली होती. यावेळी अजय देवगणने त्याच्या आयुष्यातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचा आजवरचा बॉलीवूड प्रवास, पहिला राष्ट्रीय पुरस्कार याबद्दल अजयने या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

अजय देवगणने ( Ajay Devgn) १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फूल और काँटे’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. मात्र, १५ डिसेंबर १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘जख्म’ हा महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपट अजयसाठी गेम चेंजर ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळावा हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं अन् अजयचं हेच स्वप्न ‘जख्म’ चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण झालं.

Ballon dOr Award Nomination List Announced sport news
मेसी, रोनाल्डो यांना वगळले! बॅलन डी’ओर पुरस्काराची नामांकन यादी जाहीर
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Rehana Sultan, cardiac surgery, cardiac surgery on Rehana sultan,Rohit Shetty Javed akhtar gave financial support Rehana
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्रीची प्रकृती बिघडली, आर्थिक मदतीसाठी बॉलीवूडमधील ‘हे’ लोक मदतीला आले धावून
samir kunawar, best parliamentarian award,
उत्कृष्ट संसदपटू! आमदार समीर कुणावार यांना पुरस्कार मिळण्याचे कारण काय…
National awards teachers, awards teachers maharashtra,
राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार, कोण आहेत मानकरी?
kahaani, kahaani vidya balan, kahaani sujoy ghosh
फक्त आठ कोटी बजेट असलेल्या ‘या’ बॉलीवूड सिनेमाने कमावले १०४ कोटी; पटकावले तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अमिताभ बच्चन…
national films awards
National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना भारत सरकार काय बक्षीस देते? जाणून घ्या
National Award for Documentary Varsa
‘वारसा’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार, कोल्हापूरच्या मर्दानी खेळावर आधारित विषय

हेही वाचा : महाराष्ट्राची हास्यजत्रा : समीर चौघुलेंनी शिवाली परबला दिलं गिफ्ट! कारण आहे खूपच खास, फोटो शेअर करत म्हणाली…

‘जख्म’ हा हिंदी चित्रपट महेश भट्ट यांच्या आई शिरीन मोहम्मद अली यांच्या जीवनावर आधारित होता. जीवनपट असल्याने या चित्रपटात अजयने महेश भट्ट यांची, तर पूजा भट्टने तिच्या आजी म्हणजेच शिरीन यांची भूमिका साकारली होती. याबद्दल सांगताना अजय म्हणाला, “मी तेव्हा हैदराबादमध्ये होतो, त्यावेळी महेश भट्ट यांचा या चित्रपटाबद्दल विचारपूस करण्यासाठी फोन आला होता. त्या काळात मोबाईल फोन वगैरे नसायचे. त्यामुळे त्यांनी टेलीफोनवर फोन केला होता. मी तेव्हा नेमका अंघोळीला गेलो होतो आणि सतत तो फोन वाजत होता.”

अजय देवगणला अशाप्रकारे मिळाला ‘जख्म’ चित्रपट

अजय ( Ajay Devgn ) पुढे म्हणाले, “तेव्हाच्या काळात बाथरुमच्या इथे हॉटेल रुम्समध्ये आणखी एक फोन असायचा तो मी उचलला. समोरून आवाज आला महेश भट्ट बोलतोय, मी त्यांना सांगितलं आता अंघोळ करतोय…पण, ते म्हणाले, तू फक्त माझं म्हणणं ऐकून घे…हा माझ्या करिअरचा शेवटचा चित्रपट मी दिग्दर्शित करतोय… यानंतर मी सिनेमा करणार नाही. पुढच्या ३ सेकंदात त्यांनी गोष्ट सुरू केली…तेव्हाच मी त्यांना म्हणालो, भट्ट साहेब मी अंघोळ करतो. हा चित्रपट जरूर करतो…तुम्हाला नंतर फोन करेन आणि अशाप्रकारे मला ‘जख्म’ चित्रपट मिळाला.”

हेही वाचा : ‘गोलमाल ५’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल रोहित शेट्टीचे मोठे विधान, म्हणाला “चित्रपट बनणार नाही, असे…”

Ajay devgn
अजय देवगण ( Ajay Devgn ) जख्म चित्रपट ( फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम )

अजय देवगणला याच ‘जख्म’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. “एखाद्या दिग्दर्शकाबरोबर मनापासून काम करण्याची इच्छा असेल तर गोष्ट न ऐकता आम्ही अनेकदा होकार कळवलेला आहे” असं अजय देवगण व तब्बू यांनी या मुलाखतीत अधोरेखित केलं. दरम्यान, या दोघांचा ‘औरों में कहां दम था’ हा नीरज पांडे दिग्दर्शित चित्रपट येत्या २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.