अभिनेता अजय देवगण सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याचा आगामी चित्रपट भोला काही दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनला टीमने सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून अजय देवगणने ट्विटरवर ‘आस्क भोला’ सेशन ठेवलं होतं. यामध्ये त्याने चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

फक्त तब्बूबरोबर जास्त चित्रपट का करत आहेस? चाहत्याच्या प्रश्नाला अजय देवगणने दिलं उत्तर; म्हणाला, “तिच्या…”

Chunky Panday
चंकी पांडेंचे बालपणीचे सर्व फोटो फ्रॉकमध्ये का आहेत? स्वत: सांगितलं कारण; म्हणाले, “आई-वडिलांना”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ranbir Kapoor and Alia Bhatt daughter raha clicks Shaheen Bhatt photo
रणबीर कपूर-आलिया भट्टची दोन वर्षांची लेक झाली फोटोग्राफर! राहाने आई-बाबांचा नाही तर ‘या’ खास व्यक्तीचा काढला सुंदर फोटो
anjay Raut on Varsha Bungalow Devendra Fadnavi
“वर्षा बंगला पाडून नवा बंगला बांधण्याचा घाट”, संजय राऊतांचा दावा; म्हणाले, “फडणवीसांना नेमकी कशाची भिती?”
kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
Meera Jaggnath
ज्याच्यासाठी साखरपुडा मोडला तो मुलगाच…; ‘ठरलं तर मग’फेम मीरा जगन्नाथने केला खुलासा; म्हणाली, “सहा महिन्यांनी…”
Twinkle Khanna
“अक्षय कुमार असा लहान मुलगा…”, राजकीय विचारसरणी वेगळी असल्याच्या प्रश्नांवरून ट्विंकल खन्नाचा संताप, म्हणाली…
Madhuri Dixit recalls when her 2 year old son stood up against bully
‘तुला माहितीये का मी कोण आहे?’ माधुरी दीक्षितचा अडीच वर्षांचा मुलगा ‘त्या’ला नडलेला; अभिनेत्री म्हणाली, “अरिनला धक्का…”

यावेळी एका चाहत्याने अजयला त्याचा मुलगा युगबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नावर अजयने मजेशीर उत्तर दिलं आहे. अजयने दिलेलं उत्तर चांगलंच व्हायरल झालं आहे. ‘सर तुम्ही युगला बॉलिवूडमध्ये कधी लाँच करणार आहात?’ असा प्रश्न एका चाहत्याने त्याला विचारला. त्यावर “लाँचबद्दल माहिती नाही, सध्या तरी त्याने योग्य वेळेवर लंच केला तरी मोठी गोष्ट आहे,” असं उत्तर अजयने दिलं.

यावेळी अजयने शाहरुखच्या ‘पठाण’बद्दलही प्रतिक्रिया दिली. ‘शाहरुख खानबद्दल एक शब्द’, असा प्रश्न चाहत्याने विचारला होता. त्यावर ‘पठाणसाठी फक्त प्रेम’ असं अजय म्हणाला.

दरम्यान, ‘भोला’ हा दाक्षिणात्य चित्रपट ‘कॅथी’चा हिंदी रिमेक आहे. अजय-तब्बूसह राय लक्ष्मी, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा या कलाकारांच्या यामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या ३० मार्चला ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader