बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. १८ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील ट्वीस्ट, क्लायमेक्स व कलाकरांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना धरुन ठेवलं आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करताना दिसत आहेत.
‘दृश्यम २’ ने अवघ्या दहा दिवसांतच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा गल्ला जमवला आहे. वर्ल्ड वाइड ‘दृश्यम २’ ने रविवारपर्यंत (२७ नोव्हेंबर) २०७ कोटींचा टप्पा गाठला आहे. तर या चित्रपटाने आत्तापर्यंत देशांतर्गत १४३.९० कोटींची कमाई केली आहे. ‘दृश्यम २’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५.३८ कोटींची कमाई केली होती. ‘ब्रह्मास्र’ नंतर ‘दृश्यम २’ पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
हेही वाचा>> “मी शेवटपर्यंत पत्नीधर्म निभावला पण…” मानसी नाईकचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा
हेही वाचा>> “माझ्या कॅन्सरग्रस्त आईसाठी…” बिग बॉसच्या घरात राखी सावंत भावूक
अभिजीत पाठक दिग्दर्शित या चित्रपटाने अकराव्या दिवशी ५.४४ कोटींची कमाई केली आहे. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या दृश्यम या चित्रपटाच्या सिक्वेलच्या प्रतीक्षेत गेली अनेक वर्ष प्रेक्षक होते. अखेर सात वर्षांनंतर ‘दृश्यम २’ प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांकडून चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा>>सुंबूल तौकीर ऑन स्क्रीन पती फहमान खानसह बांधणार लग्नगाठ? ‘बिग बॉस’मध्ये खुलासा करत म्हणाली…
‘दृश्यम’ व ‘दृश्यम २’ हे मल्याळम चित्रपटाचे रिमेक आहेत. अजय देवगणसह या चित्रपटात तब्बू, श्रीया सरन, इशिता दत्ता, अक्षय खन्ना या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत.