बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ या चित्रपट प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या दृश्यम या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ट्रेलरपासूनच ‘दृश्यम २’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. १८ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे शो हाऊसफूल होताना दिसत आहेत.
‘दृश्यम २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक पाठकने केलं आहे. पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम २’ची यशस्वी घौडदोड सुरू आहे. १०० कोटींचा आकडा पार करत ‘दृश्यम २’ने सात दिवसांत १०४ कोटींची कमाई केली आहे. ‘दृश्यम २’ पाहिल्यानंतर आता ‘दृश्यम ३’ साठी चाहत्यांकडून विचारणा होऊ लागली आहे. याबाबत चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक पाठकने भाष्य केलं आहे.
हेही वाचा>> टक्कल, पाण्याने भरलेले डोळे अन्…; निवेदिता सराफ यांनी शेअर केलेला फोटो ठरतोय चर्चेचा विषय
हेही वाचा>> ‘बिग बॉस मराठी’मध्ये मोठा ट्विस्ट, पहिल्यादांच होणार चार वाइल्ड कार्ड एन्ट्री, ‘ते’ स्पर्धक कोण असणार?
‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक पाठकने ‘दृश्यम ३’ व ‘दृश्यम ४’चे संकेत दिले आहेत. तो म्हणाला, “’दृश्यम २’ पाहून प्रेक्षकांनी ‘दृश्यम ३’ व ‘दृश्यम ४’ ची कथा स्वत:चं लिहायला सुरुवात केली आहे. पण ‘दृश्यम ३’ प्रदर्शित होऊन फक्त एकच आठवडा झाला आहे. या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे, याचा आम्हाला आनंद आहे. ‘दृश्यम ३’ साठी प्रेक्षक आतुर आहेत. पण ‘दृश्यम २’ मधून थोडा वेळ मिळाल्यानंतर आमची संपूर्ण टीम नक्कीच याचा विचार करेल”.
हेही पाहा>> Photos: टेरेस, स्विमिंगपूल अन्…; अलिबागमधील गावात विराट कोहली बांधणार १३ कोटींचं घर, पाहा फोटो
अभिषेक पुढे म्हणाला, “काही कथा मी आधीच लिहून ठेवल्या आहेत. पण अजून काय करता येईल याचा विचार मी करत आहे. दृश्यम २ला प्रेक्षकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर त्यांना आवडेल अशीच कथा मला द्यायची आहे”. ‘दृश्यम’ व ‘दृश्यम २’ हे दोन्ही चित्रपट मल्याळम चित्रपटाचे रिमेक आहेत. ‘दृश्यम २’नंतर आता ‘दृश्यम ३’साठी प्रेक्षक आतुर असल्याचं दिसत आहे.