बॉलिवूडचा ‘सिंघम’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. आगामी चित्रपट ‘थँक गॉड’मध्ये तो चित्रगुप्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण या भूमिकेमुळे तो अडचणीत आला आहे. या चित्रपटात अजय देवगणसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि राकुल प्रीतची महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पण या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली गेली. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख तीन दिवसांवर आली असतानाच या चित्रपटात काही मोठे बदल करण्यात येणार आहेत.

आणखी वाचा : “मी ज्यांना प्रपोज केलं त्यांनी…”; सायली संजीवचा प्रेमाबद्दल मोठा खुलासा

Muramba
Video: रमाच्या आईला ओळखण्यात माही चूक करणार अन्…; अक्षय सत्य शोधून काढणार? ‘मुरांबा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Naga Chaitanya
‘थांडेल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात नागा चैतन्यला आली पत्नी सोभिताची आठवण; म्हणाला…
3g a killer connection kissing scenes
तब्बल ३० किसिंग सीन, बोल्ड दृश्यांचा भडीमार असलेला फ्लॉप बॉलीवूड चित्रपट, कमावलेले फक्त…
vaastav 2 sanjay dutt mahesh manjrekar
महेश मांजरेकरांच्या ‘वास्तव’चा २६ वर्षांनी येणार सिक्वेल? संजय दत्त सिनेमात दिसणार की नाही? वाचा…
Chhaava Trailer Outrage Uday Samant
Chhaava Movie Trailer: “..तर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”, ‘छावा’बाबत सरकारची स्पष्ट भूमिका; उदय सामंत म्हणाले…
shahid kapoor career struggle
वडील होते प्रसिद्ध कलाकार तरीही या अभिनेत्याला राहावे लागले होते भाड्याच्या घरात, २५० ऑडिशन दिल्यावर मिळाला पहिला सिनेमा
pune balgandharva rang mandir
पुणे : नाट्यगृहांत चित्रपट संकल्पनेला प्रेक्षकांचे बळ

सिद्धार्थ मल्होत्राचा मृत्यू होतो आणि तो थेट चित्रगुप्ताकडे जातो आणि तेथे त्यांच्या सर्व पापांचा हिशेब घेतला जातो असे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. रकुल प्रीतने सिद्धार्थच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात नोरा फतेहीचे एक आयटम साँग देखील आहे. परंतु या चित्रपटात दाखवलेल्या प्रसंगांवर अनेकांनी आक्षेप घेत या चित्रपटाबद्दल तक्रार केली. पण इंद्र कुमार दिग्दर्शित ‘थँक गॉड’ या चित्रपटाला शुक्रवारी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे.

या चित्रपटाला U/A प्रमाणपत्र जरी मिळाले असले तरी सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या निर्मात्यांना या चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. त्यानुसार चित्रपटाच्या रिलीजच्या तीन दिवस आधी या चित्रपटात काही महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत. या चित्रपटातील एका फ्रेममध्ये दारूच्या ब्रँडचा लोगो स्पष्ट दिसत होता. हा लोगो ब्लर करण्यात येणार आहे. त्याशिवाय या चित्रपटातील मंदिराच्या सीनचा अँगल बदलण्यात येणार आहे. तसेच चित्रपटाच्या सुरुवातीला लिहिलेल्या प्रस्ताविकाच्या मजकूरतही बदल करण्यात येणार आहे. त्यासोबत हे प्रस्ताविक प्रेक्षकांना नीट वाचता यावे यासाठी या प्रस्ताविकाचा स्क्रीन टाईमही वाढवण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर, ‘चित्रगुप्त’ या व्यक्तिरेखेचे नाव बदलून ‘सीजी’, तर ‘यमदूत’ या व्यक्तीरेखेचे नाव बदलून ‘वायडी’ असे करण्यात येणार आहे.

हेही वाचा : “त्याने आम्हाला…”, निशिकांत कामतच्या आठवणीत अजय देवगण आणि तब्बू भावूक

‘थँक गॉड’ चित्रपटाचा पहिला टीझर समोर आला तेव्हा काही लोकांनी चित्रगुप्ताच्या नावाच्या वापरावर आक्षेप घेतला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, हा चित्रपट ठरलेल्या दिवशी, म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे

Story img Loader