नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांआधीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. या बहुचर्चित चित्रपटात बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. त्याच्याबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत झळकेल. ‘रामायण’मध्ये अनेक मराठी कलाकारांची वर्णी लागल्याचं आता समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीरच्या ‘रामायण’मध्ये अभिनेता आदिनाथ कोठारे ‘भरत’ची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता त्या पाठोपाठ आणखी एका मराठी अभिनेत्याची ‘रामायण’मध्ये एन्ट्री झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितेश तिवारींच्या बहुचर्चित ‘रामायण’मध्ये मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते अजिंक्य देव यांची एन्ट्री झाली आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘रामायण’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं होतं. शूटिंग सुरू झाल्यावर माझ्या भूमिकेविषयी सविस्तर सांगेन असंही ते म्हणाले होते.

हेही वाचा : Video : घरावर झालेल्या गोळीबारानंतर पहिल्यांदाच बाहेर पडला सलमान खान, गॅलेक्सी अपार्टमेंटजवळचा व्हिडीओ व्हायरल

आधी ‘रामायण’ चित्रपटात एन्ट्री घेतल्याचं स्पष्ट केल्यानंतर आता अजिंक्य देव यांनी कपूर कुटुंबीयांबरोबर खास फोटो शेअर केले आहेत. अजिंक्य देव यांनी अभिनेता रणबीर कपूर, त्याची आई नीतू कपूर आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर खास सेल्फी काढले. हे फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

हेही वाचा : प्रार्थना बेहेरेने का सोडली मुंबई? नवऱ्यासह ‘या’ ठिकाणी थाटला संसार; कारण सांगत म्हणाली, “अभिला सतत…”

रणबीरबरोबर झालेल्या भेटीचा फोटो शेअर करत “कपूर कुटुंबीयांची भेट घेऊन छान वाटलं” असं कॅप्शन अजिंक्य यांनी या फोटोंना दिलं आहे. दरम्यान, अभिनेते अजिंक्य देव आणि संपूर्ण कपूर कुटुंबीयांची भेट झालेली पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. याशिवाय बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर हा चित्रपट २०२५ च्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajinkya deo meets ranbir kapoor neetu and karisma shares photo sva 00