प्रभास आणि क्रिती सेनॉनचा बहुचर्चित चित्रपट‘आदिपुरुष’ १६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर यामधील डायलॉग व व्हीएफएक्सवर जोरदार टीका केली जात आहे. या चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असलेले डायलॉग ऐकून नेटकरी संताप व्यक्त करीत आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ‘आदिपुरुष’वरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा– Video: गौरी खानच्या ‘या’ गोष्टीची शाहरुखला वाटते खूप भीती; म्हणाला, “मी स्टंट करू शकतो, पण…”

अजित पवार म्हणाले, ” ‘आदिपुरुष’ असेल, ‘परपुरुष’ असेल असल्या वादाची कशाला जास्त चर्चा करता. मागेसुद्धा ‘पठाण’बाबतही असचं झालं होतं. त्याच्या आधी ‘पद्मावत’ का ‘पद्मावती’ त्याबाबतही असंच झालं होतं. मला असं वाटतं हे चित्रपट मोठ्या प्रमाणात देशपातळीवर चालण्यासाठी हे सगळं केलं जात असावं. कारण अशा प्रकारच्या बातम्या आल्या तर लोक विचार करतात की एवढी बातमी आली असं काय आहे त्या चित्रपटात आणि मग तो चित्रपट पाहिला जातो. हे त्याच्या मागचं गमक आहे की काय याचा शोध घेतला पाहिजे,” असंही अजित पवार म्हणाले.

हेही वाचा- रणवीर-आलियाच्या ‘रॉकी और रानी…’चा टीझर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित; करण जोहरची मोठी घोषणा

दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभासने प्रभू श्रीराम यांची, क्रिती सेनॉनने माता सीतेची, सैफ अली खानने रावणाची व मराठी कलाकार देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे. अवघ्या दोन दिवसांत ‘आदिपुरुष’ने २०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तिसऱ्या दिवशीही चित्रपटाने ६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.