सिनेसृष्टीत कलाकारांच्या चित्रपटांबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीदेखील खूप चर्चा होते. अशीच एक अभिनेत्री होती जिने २७ वर्षांपूर्वी मॉडेलिंगच्या क्षेत्रात नाव कमवलं होतं. त्यानंतर तिने अक्षय कुमारबरोबर बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून यशस्वी झालेल्या या अभिनेत्रीने अनेक सुपरहिट सिनेमे केले. तिने बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं. तिच्या चित्रपटांप्रमाणेच तिच्या अफेअर्सचीही चर्चा झाली. तिने ८ वर्षांपूर्वी तिच्या दोनदा घटस्फोटित असलेल्या को-स्टारशी लग्न केलं. आता ती एका मुलीची आई आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ही अभिनेत्री म्हणजे बिपाशा बासू (Bipasha Basu) होय. दिल्लीत जन्मलेली व कोलकात्यात वाढलेली बिपाशा पहिल्या चित्रपटानंतर स्टार बनली. ‘अजनबी’ हा तिचा पहिला चित्रपट होता. बॉबी देओल व करीना कपूरच्या भूमिका यात होत्या. या चित्रपटानंतर करीना व बिपाशाच्या वादाची चांगलीच चर्चा रंगली होती. यानंतर बिपाशाने ‘राज’, ‘जिस्म’, ‘नो एंट्री’, ‘ओमकारा’, ‘बचना ऐ हसीनों’, ‘रेस’ व ‘आक्रोश’ असे हिट चित्रपट दिले.

हेही वाचा – Bigg Bossच्या पहिल्याच एपिसोडला ऐतिहासिक TRP! अभिनेत्याची मोठी घोषणा; म्हणाला, “होस्ट म्हणून शेवटचा सीझन…”

आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर केलं काम

बिपाशाने तिच्या करिअरमध्ये अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, जॉन अब्राहम, सैफ अली खान, अक्षय कुमार, अजय देवगण या आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं. तिने मुख्य अभिनेत्री म्हणून शेवटचा ‘अलोन’ चित्रपट केला होता. हा चित्रपट ९ वर्षांपूर्वी २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. नंतर तिने २०१८ मध्ये ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ सिनेमात कॅमियो केला होता. तसेच ती २०२० मध्ये ‘डेंजरस’ वेब सीरिजमध्ये झळकली होती.

हेही वाचा – “माझे आई-वडील जलसामध्ये राहतात, मी…”, अमिताभ बच्चन-जया बच्चन यांच्याबरोबर राहत नाही अभिषेक बच्चन

बिपाशा वैयक्तिक आयुष्यामुळे राहिलेली चर्चेत

बिपाशा व्यावसायिक आयुष्यात खूप यशस्वी ठरली. तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली. ती अनेकवेळा प्रेमात पडली. १९९६ ते २००२ या तिच्या मॉडेलिंगच्या काळात ती डिनो मोरियाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. २००२ मध्ये तिने ‘जिस्म’मधील तिचा को-अॅक्टर जॉन अब्राहमला डेट करू लागली. हे दोघे २०११ पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. ९ वर्षांनी त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर २०२४ मध्ये काही काळ बिपाशाने हरमन बावेजाला डेट केलं.

हेही वाचा – घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायने सासरे अमिताभ बच्चन यांच्यासाठी केली पोस्ट, कॅप्शनने वेधले लक्ष

बिपाशा नंतर अभिनेता करण सिंग ग्रोव्हरच्या प्रेमात पडली. दोघांनी २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली. बिपाशाशी लग्न करण्याआधी करणचे दोन घटस्फोट झाले होते. करणचं पहिलं लग्न श्रद्धा निगमशी, दुसरं अभिनेत्री जेनिफर विंगेटशी झालं होतं. त्याची दोन्ही लग्नं फार काळ टिकली नाहीत. दोन घटस्फोटानंतर करणने बिपाशाशी तिसरं लग्न केलं. करण व बिपाशा आता एका मुलीचे आई-बाबा आहेत. त्यांची मुलगी देवीचा जन्म २०२२ मध्ये झाला.