बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चड्ढा यांचा १३ मे रोजी साखरपुडा झाला. मात्र, त्यांच्या साखरपुड्यातील एका गोष्टीवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह या साखरपुड्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. साखरपुड्यात उपस्थित राहिल्यामुळे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह यांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. परिणीतीने या नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत. अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करीत परिणीतीने साखरपुड्याला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

arrival of vegetables in huge amount for Bhogi
भोगीनिमित्त भाज्यांची मोठी आवक; भुईमुग शेंग, भेंडी, पापडी, वालवर, वांगी, गाजर महाग
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
Raveena Tandon daughter Rasha Thadani Uyi Amma In Azaad watch video
Video: रवीना टंडनच्या १९ वर्षीय मुलीचं Uyi Amma गाणं प्रदर्शित; राशाच्या जबरदस्त डान्सने वेधलं लक्ष, नेटकरी म्हणाले, “आईचं नाव…”
Madhuri Dixit
बॉलीवूड गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितला एकेकाळी म्हटले जायचे पनवती; प्रसिद्ध दिग्दर्शकांचा खुलासा, म्हणाले, “वेडा झाला…”
Marathi actress Pooja Sawant parents visit their new home in Australia for the first time
Video: पूजा सावंतच्या आई-बाबांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियातील नव्या घराला दिली भेट, लेकीचं प्रशस्त घर पाहून होती ‘ही’ प्रतिक्रिया
Image of Allahabad High Court
“पत्नीने अनैतिक संबंध न ठेवता इतरांना भेटणं म्हणजे…”, २३ वर्षांपासून वेगळं राहणार्‍या पती-पत्नीला घटस्फोट देताना न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
rajesh mapuskar rohan mapuskar
‘व्हेंटिलेटर’ फेम दिग्दर्शकाच्या मराठी सिनेमाची घोषणा, कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर करणार पदार्पण

हेही वाचा- उर्वशी रौतेलाने कान्स महोत्सवात घातला मगरीच्या डिझाईनचा नेकलेस; तब्बल ‘एवढे’ कोटी आहे किंमत

पहिल्या फोटोमध्ये परिणीती आणि राघव अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांच्यासमोर हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे. तसेच परिणीतीने साखरपुड्याच्या कार्यक्रमातील आणखी बरेच फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती राघव चढ्ढासोबत दिसत आहे. परिणीतीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह जी यांचे आशीर्वाद मिळाल्यामुळे खूप छान वाटले. आमच्या साखरपुड्यात त्यांची उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.”

अकाल तख्त साहिबचे जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह १३ मे रोजी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात उपस्थित होते. जथेदार ग्यानी हरप्रीत सिंह एक धार्मिक गुरू आहेत आणि काही दिवसांपूर्वी पंजाबमधील आप सरकारशी त्यांचे काही मुद्द्यांवरून भांडण झाले होते. त्यानंतरही त्यांनी आपचे खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला उपस्थिती दर्शवल्याने नेटकरी नाराज झाले आहेत.

हेही वाचा- Video : “लग्न झालेले पुरुषही बायकोपासून लपवून…”; कपिलच्या ‘त्या’ वाक्याने अभिनेत्री मंदाकिनी लाजल्या, व्हिडीओ व्हायरल

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी १३ मे रोजी दिल्लीच्या कपूरथळा हाऊसमध्ये मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला. या साखरपुडा समारंभाला दोघांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, साखरपुड्यानंतर आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लग्न करण्याची शक्यता आहे.

Story img Loader