सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अखेर हे दोघं ७ फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाली आहेत. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला. त्यानंतर कालच मुंबईत त्यांचं रिसेप्शन पार पडलं. याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सिद्धार्थ-किराच्या काल मुंबईत पार पडलेल्या रिसेप्शनला अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली. या रिसेप्शनला नीतू कपूर, आलिया भट्ट, अजय देवगण, काजोल, अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी,अनुपम खेर, अर्पिता-आयुष शर्मा, दिशा पाटनी, वरुण धवन, करिना कपूर खान, करण जोहर असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. त्याचबरोबर या रिसेप्शनला मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका अंबानी यांनी हजेरी लावली. आता या रिसेप्शनमधील त्यांच्या लूकने आणि नम्रपणाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
आणखी वाचा : अनंत अंबानीने साखरपुड्यात घातला होता ‘कार्टियर पँथर ब्रोच’, किंमत वाचून व्हाल आवाक्
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा ही कियारा अडवाणीची खास मैत्रीण आहे. बालपणीपासून या दोघी एकमेकींना ओळखतात. त्यामुळे अंबानी आणि अडवाणी कुटुंब यांच्यात छान बॉण्डिंग आहे. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाला देखील ईशा जैसलमेरला गेली होती. तर काल मुंबईतील त्यांच्या रिसेप्शनला ईशाचा भाऊ आकाश आणि त्याची पत्नी श्लोक उपस्थित होते. त्यांची एन्ट्री होताच सर्वांचे कॅमेरे त्यांच्याकडे वळले. मीडिया फोटोग्राफर्सनी त्यांना फोटोसाठी पोज देण्याची विनंती केली. आकाश आणि श्लोकाने देखील ती विनंती मान्य करत फोटोसाठी पोज दिल्या. पोज दिल्यानंतर ते आतमध्ये जाणार तितक्यात फोटोग्राफर्संनी पुन्हा एकदा त्यांना पोज देण्यासाठी थांबण्याची विनंती केली. त्यानंतर आकाश आणि श्लोका परत पाठिमागे आले, पुन्हा हसत हसत पोजसाठी उभे राहिले. आता त्यांच्या या नम्रपणाची सगळीकडे चर्चा आहे.
या रिसेप्शनच्या वेळी आकाशने निळ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला होता. तर श्लोकानेही भरजरी काठ असलेली काळ्या रंगाची साडी नेसली होती. त्याचबरोबर त्याला साजेसे हिऱ्याचे दागिने घातले होते. आता त्यांच्या या लूकने आणि त्यांच्या साधेपणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे आता सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचं रिसेप्शन असलं तरीही चर्चा आकाश आणि श्लोकाची रंगली आहे.