आमिर खानची मुलगी आयरा खानच्या रिसेप्शन सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या रिसेप्शन पार्टीत दिग्गज अभिनेते धर्मेंद्र, अभिनेत्री रेखा, हेमा मालिनी, जॅकी श्रॉफ, मुमताज, सायरा बानो, जया बच्चन यांनी हजेरी लावली. यांच्यासह सलमान खान, शाहरुख खान, कार्तिक आर्यन, कतरिना कैफ यांच्याबरोबर अनेक बॉलीवूडकरांनी उपस्थिती दर्शवली.
बॉलीवूड व दाक्षिणात्य कलाकारांच्या मांदियाळीत मराठमोळी लाडकी जोडी आर्ची व परश्या म्हणजेच आकाश ठोसर व रिंकू राजगुरू यांनी लक्ष वेधून घेतलं आहे. या रिसेप्शन पार्टीला आकाश व रिंकू यांनी हजेरी लावली. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आकाशने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. तर गुलाबी काठांच्या निळ्या साडीत रिंकू राजगुरू कमालीची सुंदर दिसत होती.
रिंकू व आकाश यांनी एकत्र माध्यमांना पोज दिल्या. त्यांचा आयरा व नुपूर यांच्या रिसेप्शनमधील व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. बॉलीवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या लेकीच्या रिसेप्शन सोहळ्यात रिंकू व आकाश यांनी हजेरी लावली.
आयरा खान-नुपूर शिखरेच्या लग्नाचे मुंबईत रिसेप्शन; शाही सोहळ्यातील फोटो पाहिलेत का?
दरम्यान, आयरा व नुपूर यांच्या दोन पद्धतीच्या लग्नानंतर शनिवारी मुंबईत भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला. या रिसेप्शन सोहळ्यात संपूर्ण बॉलीवूड अवतरलं होतं. या सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत.