अभिनेत्री नुसरत भरुचाच्या आगामी ‘अकेली’ चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज झाल्यापासूनच चाहते ट्रेलर व चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत असताना निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलरमध्ये नुसरत तिचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.

नितीन देसाई अनंतात विलीन! त्यांच्या स्वप्नमयी ND स्टुडिओतच कुटुंबियांनी दिला अखेरचा निरोप

daredevil series trailer release
Video: जबरदस्त अ‍ॅक्शन आणि थरारक स्टंट; मार्व्हलच्या Daredevil: Born Again चा ट्रेलर प्रदर्शित
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Navri Mile Hitlarla
Video: एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”

नुसरत भरुचाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात युद्धग्रस्त इराकमध्ये एकट्या अडकलेल्या एका भारतीय मुलीची कहाणी दाखविण्यात आली आहे. युद्धग्रस्त परिस्थितीत स्वतःचा जीव वाविण्यासाठी तिला करावा लागलेला संघर्ष पाहायला मिळत आहे. तसेच ट्रेलरमध्ये युद्धजन्य परिस्थितीचे चित्रण अतिशय उत्तमरित्या करण्यात आले आहे. नुसरत नोकरीसाठी इराकमध्ये जाते आणि तिथे अडकते त्यानंतर तिला जीव वाचविण्यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षाची कथा ‘अकेली’मध्ये पाहायला मिळते.

नितीन देसाईंचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर, पत्नी व मुलीचे फोटो आले समोर

चित्रपटाचा ट्रेलर खूप उत्कंठावर्धक आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला नुसरत भरुचा बुरखा घालून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण काही सशस्त्र लोकांनी तिला घेरल्याचं दिसतं. कुटुंबापासून दूर इराकमध्ये असलेल्या या तरुणीला इतर मुलींसोबत बंदी बनवलं जातं. त्यानंतर शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचा घृणास्पद खेळ या ट्रेलरमध्ये दाखवला जातो.

‘अकेली’मध्ये नुसरत भरुचा व्यतिरिक्त निशांत दहिया, त्साही हालेवी आणि अमीर बुत्रस हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १८ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रणय मेश्रामने केले आहे.

Story img Loader