२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ या बिगबजेट चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या फ्लॉप चित्रपटांवरुन त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका सुद्धा झाली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये त्याचा ‘कटपुतली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अक्षयचे आधीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर न चालल्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ओटीटी आधार घेतला. पुढे ‘कटपुतली’ चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटामधील अक्षयचे काम लोकांना आवडले. दरम्यान दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्याचा ‘रामसेतु’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होणार असल्याची घोषणा करण्यात आली.

यंदाच्या दिवाळीमध्ये अक्षय कुमारचा ‘रामसेतु’ आणि अजय देवगन-सिद्धार्थ मल्होत्राचा ‘थँक गॉड’ असे दोन मोठे चित्रपट आमने-सामने होते. या अटीतटीच्या लढाईमध्ये ‘राम सेतु’ने बाजी मारली आहे असे म्हटले जात आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १५ कोटी रुपयांची कमाई केली. दुसऱ्या दिवशीही चित्रपटाचे चांगले कलेक्शन झाले. बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवरुन या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात येत आहे.

आणखी वाचा – “हे सर्व रातोरात मिळालेलं…” ‘कांतारा’च्या यशावर रिषभ शेट्टीची पहिली प्रतिक्रिया

दिवाळीच्या सुट्टीमध्ये अक्षयच्या चाहत्यांनी ‘राम सेतु’ पाहण्याचा आनंद घेतला आणि व्हिडीओद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर केल्या. अक्षय कुमार सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. त्याने चाहत्यांचे बरेचसे व्हिडीओ रिशेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये त्याचे चाहते चित्रपट संपल्यानंतर चित्रपटगृहामध्ये ‘जय श्री राम’ म्हणत नाचत आहेत असे पाहायला मिळते. तर दुसऱ्या फोटोमध्ये चित्रपटाच्या पोस्टरवर फुलाचा हार घालून त्याचा गौरव केला असल्याचे दिसते.

आणखी वाचा – “ती तर ड्रामा क्वीन…” सुष्मिता सेनच्या भावाने फेटाळले पत्नीने केलेले मारहाणीचे आरोप

अभिषेक शर्मा यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात त्याने डॉ. आर्यन कुलश्रेष्ठ या पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये अक्षयसह नुसरत भरुचा, जॅकलिन फर्नांडिस आणि दाक्षिणात्य अभिनेते सत्य देव यांनी काम केले आहे. २०२० मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

Story img Loader