२०२० मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यात फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली तेव्हापासूनच हा विषय चांगलाच चर्चेत आला. त्यावेळी बॉलिवूडवर बरीच मंडळी नाराज होती. योगी आदित्यनाथ यांच्या या घोषणेमुळे बरेच लोक खुश होते. आता या प्रोजेक्टसंदर्भात एक नवी माहिती समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार व दिग्दर्शक बोनी कपूर मिळून या फिल्म सिटीच्या निर्माणकार्यात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तब्बल १००० एकर परिसरात ही फिल्म सिटी उभारण्यात येणार असून नुकतीच यासाठी टेंडर मागवण्यात आली होती. याचसाठी अक्षय कुमारच्या Cape of Good Films, Maddock Films च्या Supersonic Technobuild Private Limited कंपनीने आणि बोनी कपूर यांच्या Bayview Projects कंपनीने तसेच ‘टी-सीरिज’ कंपनीनेही यासाठी टेंडर पाठवली आहेत. ‘ईकोनॉमिक टाइम्स’च्या रीपोर्टनुसार या फिल्म सिटीचं काम तीन टप्प्यात पार पडणार आहे. या फिल्म सिटीच्या निर्माणासाठी १०००० कोटी रुपये खर्च होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा : “तो अगदी माझ्यासारखाच…” विवेक ओबेरॉयचं ‘अ‍ॅनिमल’ स्टार रणबीर कपूरबद्दलचं विधान चर्चेत

पहिल्या टप्प्यात २३० एकर परिसरातील काम सुरू होऊन ते २०२८ किंवा २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच मीडिया रीपोर्टनुसार १००० एकरपैकी ७४० एकर जमीन ही चित्रपटांच्या इतर शूटिंगसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. उरलेल्या जमिनीपैकी ४० एकर जागा ही फिल्म इंस्टीट्यूटसाठी राखीव ठेवण्यात आली असून १२० एकर परिसरात अम्यूजमेंट पार्क बनवण्यात येणार असून उर्वरीत १०० एकर जमीन ही व्यावसायिक गोष्टींसाठी ठेवण्यात आली आहे.

या सगळ्यासाठी अक्षय कुमार व बोनी कपूरसारखे कलाकार पुढे येऊन हातभार लावणार असल्याने त्यांची जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर फिल्म सिटीपासून चार किलोमीटर अंतरावरच नोएडाजवळ एका विमानतळाचेही काम सुरू आहे जेणेकरून याचा फायदा फिल्म सिटीला अधिक होऊ शकतो. योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेनंतर या प्रोजेक्टबद्दल बऱ्याच शंका कुशंका मनात येत होत्या, परंतु आता बॉलिवूडमधील कलाकार मंडळीदेखील यात सहभागी होताना दिसत असल्याचे चित्र पाहून नक्कीच एक सकारात्मक विचार आपल्या मनात येऊ शकतो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar and boney kapoor company submits bid for film city in noida avn