डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन व गोविंदा यांची प्रमुख भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता लवकरच या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका आहे. दरम्यान, या चित्रपटाचा टायटल ट्रॅक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षयने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अक्षयबरोबर टायगरही दिसून येत आहे. हे पोस्टर गाण्यातील एका सीनदरम्यानचे असल्याचे दिसून येत आहे. हे पोस्टर शेअर करत अक्षयने लिहिले “बडे का स्वैग, छोटे का स्टाइल… 3 दिवस बाकी! ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ शीर्षक गीत १९ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.” या टायटल ट्रॅकला ‘पार्टी सॉन्ग फॉर द सीझन’ म्हटले जात आहे.

Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Kal Ho Naa Ho Re-Release
२१ वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान-प्रीती झिंटाचा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी कोणाच्या डोक्यावर असेल श्रीहरी व महादेवाचे कृपाछत्र; वाचा तुमचे राशिभविष्य
BJP Astrological Predictions 2024 Shani Impact on BJP Future in Marathi
BJP Astrological Predictions 2024: शनी भाजपासाठी अडचणींचा, निवडणुकांमध्ये होणार मोठा धमाका; वाचा ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. जफर, जॅकी भगनानी, वाशु भगनानी, दीपशिखा देशमुख आणि हिमांशू किशन मेहरा यांनी पूजा एंटरटेनमेंट आणि एएझेड फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर आहे, जो हिंदीसह तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा- भारतात नव्हे, ‘या’ देशात होणार अनुष्का-विराटच्या दुसऱ्या बाळाचा जन्म? हर्ष गोयंका यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

या चित्रपटात अक्षय कुमार टायगर श्रॉफ व्यतिरिक्त , सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ. आणि रोनित बोस रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, स्कॉटलंड, लंडन, ल्युटन, अबुधाबी आणि जॉर्डन येथे झाले आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच १० एप्रिल २०२४ रोजी रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.