डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन व गोविंदा यांची प्रमुख भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. आता लवकरच या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व टायगर श्रॉफची प्रमुख भूमिका आहे.

नुकताच या चित्रपटाचा टायटल ट्रॅक प्रदर्शित झाला. या गाण्यामध्ये अक्षय व टायगरने जबरदस्त डान्स केला आहे. प्रेक्षकांकडून या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे गाणे बघून चाहत्यांना अमिताभ व गोविंदाच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची आठवण येत आहे. या गाण्यात १०० हून अधिक डान्सरचा सहभाग आहे. हे गाणे बॉस्को-सीझरने कोरिओग्राफ केले आहे, तर अनिरुद्ध रविचंदर आणि विशाल मिश्रा यांनी गायले आहे. गाण्याचे बोल इर्शाद कामिल यांनी लिहिले आहेत. हे गाणे डेहराडूनमध्ये शूट करण्यात आले आहे.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Eknath Shinde, Vijay Shivtare, Purandar Haveli,
पुरंदर विमानतळ ‘असा’ उभारणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा ! विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ घेतली सभा
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. जफर, जॅकी भगनानी, वाशु भगनानी, दीपशिखा देशमुख आणि हिमांशू किशन मेहरा यांनी पूजा एंटरटेनमेंट आणि एएझेड फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर आहे, जो हिंदीसह तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा- आदित्य नारायणने कॉन्सर्टमध्ये फोन फेकलेल्या चाहत्याला मिळाला नवा मोबाइल, गायकाने नाहीतर ‘यांनी’ दिला भेट…

या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ. आणि रोनित बोस रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत; तर दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, स्कॉटलंड, लंडन, ल्यूटन, अबुधाबी आणि जॉर्डन येथे झाले आहे. हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच १० एप्रिल २०२४ रोजी रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.