Manipur Violence:मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची खळबळजनक घटना घडली आहे. इतकंच नव्हे तर पीडित महिलांना रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही या घटनेबद्दल ट्वीट केलंय.

हेही वाचा – Manipur Horror: दोन महिलांना नग्न करत काढली धिंड, सामूहिक बलात्काराचा आरोप

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
badshah post on diljit dosanjh ap dhillon dispute
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहने घेतली उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “आम्ही केलेल्या चुकांची…”
kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो

“मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून मी हादरलो आहे. दोषींना एवढी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणीही असे भयंकर कृत्य करण्याचा विचारही करणार नाही, अशी मी आशा करतो,” असं अक्षय कुमारने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी या व्हायरल व्हिडीओबाबत निवेदन जारी केलं. ते म्हणाले, “दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली. यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार, पोलीस म्हणाले, “या प्रकरणाचा…”

नेमकी घटना काय?

‘इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम’ (ITLF) ने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरची राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी ही घटना घडली होती. याबाबत कांगपोकपी येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी पोलिसांना तातडीने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

Story img Loader