Pahalgam Terror Attack: २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन येथे दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या दहशतवादी हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त करत आहे. बॉलीवूडचे सेलिब्रिटीदेखील संतप्त भावना व्यक्त करताना दिसत आहेत. अभिनेता अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अक्षय पहलगाममधील हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहे.
अक्षय कुमार सध्या ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात जालियनवाला बाग हत्याकांड विषयी दाखवण्यात आलं आहे. चित्रपटात अक्षयने वकील सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारली आहे. अक्षयने ही भूमिका इतक्या ताकदीनुसार केली आहे की, प्रेक्षक भावुक होताना पाहायला मिळत आहे. चित्रपटात एक असा सीन आहे, ज्यामध्ये जनरल रेजिनाल्ड डायर शंकरन यांना ब्रिटिशचा गुलाम म्हणतो. तेव्हा शंकरन दोन शब्दात उत्तर देतात की, फXXX यू. आता अक्षयने हेच शब्द दहशतवाद्यांसाठी आपल्या चाहत्यांकडून बोलून घेतले आहेत.
२६ एप्रिलला अक्षय कुमार ‘केसरी चॅप्टर २’च्या मुंबईतील स्क्रीनिंगदरम्यान चाहत्यांना सरप्राइज देण्यासाठी पोहोचला होता. त्यावेळी अक्षयने सगळ्यांशी संवाद साधला आणि म्हणाला, “तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे की, जेव्हा हा चित्रपट करत होता तेव्हा प्रत्येक सीन करताना मी आणि दिग्दर्शक विचार करत असायचो की, जालियनवाला बाग हत्याकांडनंतर सगळ्यांच्या मनात किती राग, संताप निर्माण झाला असेल. तोच राग, संताप पुन्हा जागा झाला आहे. मी कशाबद्दल बोलतोय ते तुम्हाला कळलंच असेल. आजही आपण त्या दहशतवाद्यांना एक गोष्ट सांगितली पाहिजे, जे मी चित्रपटात म्हटलं आहे. ते काय? त्यानंतर उपस्थित असलेले सर्वजण ओरडू लागले, फXXX यू. अक्षय कुमारच्या याच व्हायरल व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
"F…K you Pakistan" slogans from the audience of #KesariChapter2 show .
— Kapil`ॐ (@iAKsSaviour) April 26, 2025
only #AkshayKumar has the guts to say this openly , bollywood ka sher ? ?#PahalgamTerroristAttack pic.twitter.com/uu3IWTPLXg
दरम्यान, ‘केसरी चॅप्टर २’ ऑस्ट्रेलिया, जर्मनी, मलेशिया, न्यूझीलंड, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्समध्येही प्रदर्शित झाला. या चित्रपटाने अमेरिकेत चांगली कामगिरी केली आहे. अमेरिकेत आतापर्यंत ७ कोटींची कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘केसरी चॅप्टर २’ने पहिल्या सहा दिवसांत जगभरात ६४ कोटी रुपये कमावले आहेत.