बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘बडे मियां छोटे मियां’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्यापूर्वी अक्षय अबू धाबीला पोहोचला. अबू धाबीमध्ये बांधल्या गेलेल्या पहिल्या हिंदू मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला त्याने हजेरी लावली आणि आशीर्वाद घेतले. यावेळी अक्षय कुमारने पांढरा आणि सोनेरी रंगाचा कुरता परिधान केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अबू धाबीतील या मंदिराचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. अबू धाबीमधील मंदिर प्राचीन स्थापत्य पद्धतींचा वापर करून बांधले गेले आहे. या मंदिराला बीएपीएस हिंदू मंदिर असं म्हटलं जातंय. तापमान मोजण्यासाठी आणि भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या मंदिर ३००हून अधिक हाय-टेक सेन्सर्स बसवले गेले आहेत. मंदिराच्या बांधकामात कोणत्याही धातूचा वापर केलेला नाही.

बीएपीएस स्वामीनारायण संस्थेने दुबई-अबू धाबी शेख झयद्द महामार्गावरील अल रहबाजवळ अबू मुरेखाह येथे २७ एकर जागेवर सुमारे ७०० कोटी रुपये खर्च करून हे भव्य मंदिर बांधले आहे.

हेही वाचा… पूनम पांडेचे मृत्यूचे खोटे नाटक तिच्या एक्स पतीलाही भोवणार, दोघांविरोधात १०० कोटींचा मानहानीचा गुन्हा दाखल

मंगळवारी यूएईबरोबर अनेक द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी केल्यानंतर आणि हाय-व्होल्टेज ‘अहलान मोदी’ कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी संध्याकाळी अबू धाबीमधील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींनी केले. त्यानंतर आखाती प्रदेशाच्या दोन दिवसीय दौऱ्याचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी दोहाला गेले.

हेही वाचा… “सहा महिने वर्कशॉप करूनही एका रात्रीत माझ्या जागी स्टारकिडला घेतलं,” प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली बॉलीवूडमधील परिस्थिती

दरम्यान, अक्षय कुमारच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास त्याचा आगामी चित्रपट ‘बडे मियां छोटे मियां’ १० एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ प्रमुख भूमिका साकारणार आहेत तर मानुशी चिल्लर, सोनाक्षी सिन्हा, रोनित रॉय, अलाया फर्नीचरवाला आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar attended the inauguration of abu dhabis first hindu stone temple which narendra modi inaugurated dvr