अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट यंदा ईदनिमित्त ११ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला. अक्षय आणि टायगर या दोघांनी मिळून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं होतं. परंतु, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटाला दमदार ओपनिंग मिळाली. परंतु, दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता अक्षय आणि टायगरसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग करत बॉक्स ऑफिसवर देशभरात १५.५० कोटींचा, तर जगभरात ३६.३३ कोटींचा व्यवसाय केला होता. यानंतर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाली होती. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निम्मी कमाई केली होती. परंतु, यानंतर आलेल्या वीकेंडमुळे चित्रपटाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises husband yogesh sambherao
दोन महिन्यांचा मुलगा, चित्रपटाची ऑफर आली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “नवऱ्याने…”
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

हेही वाचा : घरावर गोळीबार झाल्यावर सलमान खानचा मोठा निर्णय, अभिनेत्याने सांगितलं की कोणीही आता…

‘बडे मियाँ छोटे मियाँ’साठी वीकेंडला प्रेक्षकांनी गर्दी केल्यामुळे आता हा चित्रपट अवघ्या पाच दिवसांत १०० कोटींचा टप्पा गाठणार आहे. यंदा बॉक्स ऑफिसवर अक्षयचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि अजय देवगणचा मैदान चित्रपट एकत्र रिलीज झाला होतो. या बॉक्स ऑफिस क्लॅशमध्ये खिलाडी कुमारने बाजी मारल्याचं नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट आज पाचव्या दिवशी १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणार आहे. याआधी २०२४ मध्ये ऋतिक-दीपिकाच्या फायटर चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला होता. आता यामध्ये ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाचं नाव जोडलं जाईल. अवघ्या पाच दिवसांत हा चित्रपट १०० कोटींच्या घरात प्रवेश करणार आहे. चौथ्या दिवशी या चित्रपटाने ९६.१८ कोटींची कमाई केल्याने पाचव्या दिवशी हा चित्रपट अगदी सहज १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश घेईल.

हेही वाचा : “जेवढ्या लोकांनी हिणवलं…”, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीने बॉडी शेमिंगबद्दल मांडलं मत; म्हणाली, “जाड असण्याबद्दल…”

याशिवाय अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या मैदान चित्रपटाने जगभरात आतापर्यंत ३२.२ कोटींचा व्यवसाय केला आहे. दोन्ही चित्रपट एकत्र प्रदर्शित झाल्याने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी उत्सुकता निर्माण झाली होती. कलेक्शनच्या बाबतीत अक्षय कुमारने बाजी मारली असली तरीही अजय देवगणने ‘मैदान’मध्ये साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Story img Loader