बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या दानशूरपणाबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे. एवढंच नाही तर तो त्याच्या चाहत्यांची नेहमीच काळजी घेताना आणि तेवढ्याच उत्साहाने त्या सर्वांना भेटताना दिसतो. अशात आता अक्षय कुमारचा असा एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून नेटकरी पुन्हा एकदा अक्षयवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप चर्चेत असून अक्षय कुमारच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्विटरवर अक्षय कुमारच्या बऱ्याच चाहत्यांनी त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘सेल्फी’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यातील अक्षय कुमारच्या बॉडीगार्डचं वागणं आणि त्यानंतर अक्षयने केलेली ‘ती’ कृती कैद झाली आहे.

आणखी वाचा- इंटीमेट सीननंतर व्हॅनिटीमध्ये बसून रडलेली श्वेता तिवारी, व्हिडीओ पाहून मुलगी म्हणाली, “चुकीचं काही…”

व्हिडीओमध्ये अक्षय कुमार ‘मैं खिलाडी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्याच्याबरोबर सहकलाकार इमरान हाश्मीसुद्धा दिसत आहे. त्यानंतर तो स्टेजवरू उतरून बॅरिकेड्सच्या जवळ उभा राहिलेल्या चाहत्यांना भेटायला जातो. तो सर्व चाहत्यांशी हात मिळवत असतो तेवढ्यात एक चाहता बॅरिकेट्स ओलांडून अक्षय भेटण्यासाठी येतो.

चाहत्याला अक्षय कुमारच्या दिशेने येताना पाहून त्याच्या बॉडीगार्ड्सनी त्याला धक्का देऊन मागे ढकललं. त्यामुळे तो चाहता मागे जाऊन पडला. हे पाहिल्यानंतर अक्षय कुमारने गार्ड्सना थांबवलं आणि त्या चाहत्याला आधार देत उठवलं आणि त्याला मिठी मारली. अर्थात अक्षयचे बॉडीगार्ड त्यांचं कामच करत होते. पण एवढ्या गर्दीतही अक्षय कुमारने केलेली ही कृती सर्वांना भावली. आता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

आणखी वाचा- अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या मेकअप आर्टिस्टवर बिबट्याचा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी पहिल्यांदाच ‘सेल्फी’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मेहताने केलं आहे. हा मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा हिंदी रिमेक आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar bodygards push back to fan actor hugs him video viral mrj