Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवणारा एक उमदा कलाकार गेल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास, हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक सुपरहीट चित्रपटांसाठी त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

रामोजी फिल्म सिटीइतकाच भव्य एन.डी स्टुडिओही त्यांनी कर्जतमध्ये उभारला होता. नितीन देसाई यांनी त्यांच्या याच स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. अद्याप यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही. नितीन देसाई यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
मृणालने ठाकूरनं 'पाणी' सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं आहे. (Mrunal Thakur/ Instagram)
मृणाल ठाकूरनं ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचं केलं कौतुक; पोस्ट शेअर करत म्हणाली, “राष्ट्रीय पुरस्कारासाठी तुम्ही…”
bigg boss marathi season 5 fame Ankita Walawalkar meet yogita Chavan with future husband before wedding
लग्नाआधी अंकिता वालावलकर भेटली योगिता चव्हाणला; फोटो पाहून ‘डीपी दादा’ची प्रतिक्रिया, म्हणाला, “पचणार नाही…”

आणखी वाचा : जेव्हा अडीच लाखांच्या जनसमुदायासमोर नरेंद्र मोदींनी केलेलं नितीन देसाईंचं कौतुक; नेमकं काय घडलेलं, जाणून घ्या

मराठी कलाकारांबरोबरच बॉलिवूड कलाकारांनीही नितीन देसाई यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूड अभिनेता याने आज प्रदर्शित होणाऱ्या त्याच्या आगामी चित्रपट ‘ओह माय गॉड २’चे ट्रेलर लॉंचदेखील रद्द केले आहे. अक्षय कुमार याबद्दल ट्वीट करत म्हणाला, “नितीन देसाई यांच्या अकाली निधनाची बातमी ऐकून फार वाईट वाटलं. ते अत्यंत मेहनती कलाकार होते आणि आमच्या चित्रपट क्षेत्राचा एक अविभाज्य घटक होते. त्यांनी माझ्या बऱ्याच चित्रपटांसाठी काम केलं आहे. हे खूप मोठं नुकसान आहे. यामुळेच आम्ही आज प्रदर्शित होणाऱ्या ‘ओह माय गॉड २’चं ट्रेलर लॉंच रद्द करत आहोत. हा ट्रेलर उद्या सकाळी ११ वाजता प्रदर्शित होईल.”

अक्षयच्या या ट्वीटची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. नितीन देसाई यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं. एखाद्या चित्रपटाचं ‘लार्जर दॅन लाईफ’ असं चित्र उभं करण्यात नितीन देसाई यांचा सिंहाचा वाटा होता.

Story img Loader