बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपट देऊनसुद्धा अक्षय कुमारच्या हातात बरंच काम आहे. ‘द ग्रेट इंडियन रेस्क्यू’, ‘छोटे मियां बड़े मियां’, ‘जॉली एलएलबी ३’,’हेरा फेरी ४’ अशा बऱ्याच चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. अशातच अक्षयच्या आणखी एका चित्रपटाची चर्चा होत आहे तो म्हणजे ‘वेल्कम ३’. ‘वेल्कम २’मधून अक्षय कुमारला काढल्याचा फटका बसल्याने यावेळी तिसऱ्या भागात निर्मात्यांनी अक्षयला पुन्हा घ्यायचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या ‘वेल्कम ३’ हा अक्षय कुमारने आकारलेल्या मानधनामुळे जास्त चर्चेत आहे. सलग फ्लॉप चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमार व इतर काही सुपरस्टार्सनि त्यांचं मानधन कमी करावं अशी चर्चा मध्यंतरी बऱ्याच निर्मात्यांमध्ये झाली होती, पण अक्षय कुमारने आपलं मानधन काही फारसं कमी केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘वेल्कम ३’साठी अक्षयने एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त मानधन आकारल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : “त्यांनी २० वर्षांपूर्वीच…” कमल हासन यांच्याबद्दल ए आर रेहमान यांनी व्यक्त केल्या भावना

मीडिया रीपोर्टनुसार अक्षय कुमारने ‘वेल्कम ३’साठी ९५ कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे. कन्नड चित्रपट ‘केजीएफ चॅप्टर १’चं बजेट हे ८० कोटी असल्याचं म्हंटलं जातं आणि यापेक्षा अधिक मानधन अक्षय कुमारने आकारल्याने या गोष्टीची चर्चा होताना दिसत आहे. ‘वेल्कम ३’चं बजेट जवळपास ३०० ते ४०० कोटी इतकं असू शकतं, याबद्दल अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी अक्षय कुमारचे मानधन हा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे.

‘वेल्कम ३’ हा चित्रपट अहमद खान दिग्दर्शित करणार आहेत. पहिल्या दोन्ही भागात उदय शेट्टी आणि मजनू भाई या भूमिका निभावणारे अनिल कपूर आणि नाना पाटेकर मात्र या तिसऱ्या भागात आपल्याला दिसणार नाहीत. त्यांच्याऐवजी संजय दत्त आणि अर्शद वारसी ही सुपरहीट जोडी या तिसऱ्या भागात दिसणार आहे. जॅकलिन फर्नांडिज आणि दिशा पाटनी या दोघीसुद्धा या चित्रपटात झळकणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar charged heavy fee for welcome 3 report says its higher than entire budget of kgf avn
Show comments