अभिनेत्री ट्विंकल खन्नाने नुकत्याच पार पडलेल्या मातृदिनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. १२ मे रोजी जगभरात मातृदिन साजरा झाला. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांचा आईचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. लेखिका आणि उद्योजिका ट्विंकल खन्नानेदेखील तिच्या आईसाठी ‘मिसेस फनीबोन्स’ या तिच्या कॉलमच्या आवृत्तीमध्ये लिहिलं आहे.
ट्विंकलच्या बालपणापासून ते पालकत्वापर्यंतच्या प्रवासापर्यंतच्या आईच्या भूमिकांबद्दल तिने यात उल्लेख केला आहे. ट्विंकल खन्नाची आई डिंपल कपाडियाचा उल्लेख करत ट्विंकलने लिहिलं की, “आईची मोठी ड्यूटी ही असायची की ती मी आणि माझी बहिण रिंकीने दोन पोळ्या खाल्ल्या आहेत की नाही, आणि दोघांच्या केसांची नीट वेणी घातली गेली आहे की नाही याकडे लक्ष देणं.”
हेही वाचा… “नेटफ्लिक्स अडल्ट आणि गलिच्छ…”, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’बद्दल कॉमेडीयन सुनील पालची टीका, म्हणाला…
ट्विंकलने तिच्या ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या कॉलममध्ये लिहिताना, तिच्या आईला एक मॉडर्न आई असं म्हटलं आहे. आईला एक थेरपिस्ट, इव्हेंट प्लॅनर, स्टायलिस्ट, शिक्षक अशा अनेक प्रकारचं काम कराव लागलं. असंही तिने नमूद केलंय.
आईपणाबद्दल सांगताना ट्विंकलने तिचा अनुभवदेखील शेअर केला. एकदा अक्षय कुमारने एकदा तिची तुलना गायीशी केली होती, असं ट्विंकलने सांगितलं. २००२ मध्ये ट्विंकलने मुलगा आरवला जन्म दिला होता. एकेदिवशी कोणीतरी घरी भेटायला आलं होतं. त्यांनी अक्षयला ट्विंकल कुठे आहे? असं विचारलं. त्यावर अक्षय म्हणाला होता की, ती सध्या इथे नाहीये, कारण ती दूध देत आहे. त्याने स्तनपान करतेय ऐवजी दूध देतेय असं म्हटलं आणि लगेच त्याने माझ्यासारख्या हॉट मुलीला अप्रत्यक्षपणे गाय म्हटलं, असं ट्विंकल थट्टा करत म्हणाली.
हेही वाचा… “माझं तुझ्यावर खूप प्रेम…”, अभिनेत्री अनुषा दांडेकरची भूषण प्रधानसाठी खास पोस्ट, म्हणाली…
ट्विंकलने मॉडर्न मातांना होणाऱ्या अनेक संघर्षांबद्दलही सविस्तर यात लिहिलं आहे. स्वत:च करिअर सांभाळून माता हा विचार करत असतात की आपलं मूल चांगलं संस्कार घेऊन मोठं होतंय ना. धावपळीच्या जिवनातही त्यांच सतत त्यांच्या मुलांकडे लक्ष असतं. एखाद्या बबल रॅपमध्ये गुंडाळल्यासारख आणि संघर्षाशिवाय असलेलं जीवन आजच्या मातांना मुलांना द्यायचं असतं. पण वास्तविक जीवनात कठीण गोष्टींचा अनुभव घेणही तितकंच गरजेच असतं.
हेही वाचा… उर्फी जावेदने खरंच केलंय टक्कल? व्हायरल झालेला फोटो पाहून नेटकरी म्हणाले…
दरम्यान, ट्विंकल खन्नाबद्दल सांगायचं झालं तर १९९५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे ट्विंकलने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनेक सिनेमे करत ट्विंकलने प्रसिद्धी मिळवली. १७ जानेवारी २००१ रोजी ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार लग्नबंधनात अडकले. अभिनयाबरोबरच ट्विंकल उत्तम लेखिका असल्याने २०१५ साली ‘मिसेज फनीबोन्स’ हे पहिलं पुस्तक ट्विंकलने प्रकाशित केलं. ‘पॅड मॅन’, ‘खिलाडी’ अशा अनेक सिनेमांची ती सह-निर्मातीदेखील आहे.