बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो अनेकदा त्याची पत्नी ट्विंकल खन्ना, मुलगा आरव आणि मुलगी नितारा यांच्याबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अक्षय कुमार हा त्याच्या कुटुंबियांबरोबरच्या अनेक गंमतीजमतीचे व्हिडीओ शेअर करताना दिसतो. अक्षय आणि ट्विंकल या दोघांची जोडी ही सिनेसृष्टीत फारच चर्चेत असते. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला २२ वर्षे पूर्ण झाली आहे. मात्र आता अक्षय कुमारने त्याच्या लग्नाला ‘मौत का कुआ’ असे म्हटले आहे.

अक्षय कुमारने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तो एका ठिकाणी सर्कस पाहत असल्याचे दिसत आहे. यावेळी सर्कस करणारी काही मंडळी ही विविध स्टंट करताना दिसत आहे. अक्षयने शेअर केलेल्या या व्हिडीओत त्याने एका स्टंटचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात एक व्यक्ती हा सुसाट वेगाने एका गोलात दुचाकी चालवताना दिसत आहे. याला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. त्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : “माझ्या मुलाने तो बोल्ड सीन पाहिला अन् वाढदिवशीच…” ट्विंकल खन्नाने केलेला मोठा खुलासा

या व्हिडीओला कॅप्शन देताना अक्षयने स्वत:च्या लग्नाला ‘मौत का कुआ’ असे म्हटले आहे. “काल मी माझ्या कुटुंबाला जुनी सर्कस पाहायला घेऊन गेलो होतो. त्यावेळी मला बायकोने विचारले हा स्टंट सुरु आहे त्याला काय म्हणतात. त्यावर अक्षय मनातल्या मनात म्हणाला मला खरतंय याला लग्न असे म्हणायचे आहे”, असे त्याने यात म्हटले आहे. त्याबरोबरच त्याने ‘मौत का कुआ’ असा हॅशटॅगही दिला आहे.

आणखी वाचा : “हा लूक अजून फायनल झालेला नाही…” छत्रपती शिवरायांची भूमिका साकारण्याबद्दल अक्षय कुमारचे जाहीर वक्तव्य

अक्षय कुमारचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडीओला चांगली पसंती मिळाली. अनेकांनी कमेंट करत यावर रिप्लाय दिला आहे. दरम्यान अक्षय कुमारने नवीन वर्षाची सुरुवात कुटुंबाला वेळ देत केली आहे. त्याने नववर्षाच्या सुरुवातीला कुटुंबाबरोबर वेळ घालवला आहे. त्याबरोबरच त्याने सर्कसचा आनंदही लुटला.

दरम्यान अक्षय सध्या ‘OMG 2’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय अक्षय ‘रक्षाबंधन’, ‘सिंड्रेला’, ‘डबल एक्स एल’, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘राऊडी राठौर २’ मध्ये दिसणार आहे. तर या आधी त्याचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

Story img Loader