सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मुकेश अंबानींच्या लाडक्या लेकाच्या लग्नाला देश विदेशातील अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली आहे. शाहरुख खान, सलमान खानपासून ते युकेचे माजी पंतप्रधान बोरीस जॉनसन, सॅमसंगचे सीईओ व इतर अनेक पाहुणे लग्नासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार या सोहळ्याला हजर राहिला नसल्याने त्याच्या गैरहजेरीबद्दल विविध अंदाज लावले जात होते. स्वत: नवरा मुलगा म्हणजेच अनंत अंबानीने अक्षय कुमारला घरी जाऊन या लग्नसोहळ्याचे आमंत्रण दिले होते. असे असताना तो गैरहजर का? असा अनेकांना प्रश्न पडला होता. आता अक्षय कुमारच्या गैरहजेरीचे कारण समोर आले आहे.

‘हिंदूस्तान टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार त्याच्या ‘सरफिरा’ या चित्रपटाचे प्रमोशन करत होता. यादरम्यान तो आजारी पडला. त्याच्या टीममधील काही लोकांना करोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यानेदेखील कोव्हिड टेस्ट केली. शुक्रवारी सकाळी तो कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे समजले आहे. त्यामुळे तो ‘सरफिरा’ चित्रपटाचे शेवटच्या टप्प्यातील प्रमोशन करू शकणार नाही, त्याबरोबरच देशातील सर्वात मोठ्या लग्नालादेखील हजेरी लावू शकणार नाही. ही बातमी त्याच्यासाठी निराशाजनक होती, पण त्यानंतर लगेचच त्याने जबाबदारीने इतरांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.

Pooja Sawant First Makar Sankranti Celebration
Video: पूजा सावंतने पतीबरोबर ऑस्ट्रेलियात साजरी केली पहिली मकर संक्रात; सासूबाई कमेंट करत म्हणाल्या…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Anil Deshmukh criticized BJP and amit shah
अमित शहां यांना अनिल देशमुखांचे चोख उत्तर म्हणाले,”शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा भाजपच दगाबाज “
from former Chief Minister Prithviraj Chavan Question over responsible for the extortion cases in the state
राज्यातील खंडणीच्या प्रकारांना मुख्यमंत्री, गृहमंत्री नव्हे तर कोण जबाबदार ? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची विचारणा
ramesh mantri
पडसाद : रमेश मंत्री यांची निवड त्यांच्या साहित्यिक कारकीर्दीच्या आधारेच!
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस

हेही वाचा : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात झाला ‘इतक्या’ कोटींचा खर्च; किंमत वाचून व्हाल थक्क

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाबद्दल बोलायचे झाल्यास गेल्या काही दिवसांपासून विधींना सुरुवात झाली आहे. हळदीच्या वेळी राधिकाने खऱ्या फुलांचा घातलेला ड्रेस लक्षवेधी होता. याबरोबरच, या संपूर्ण सोहळ्याला जगाच्या कानाकोपऱ्यातून पाहुण्यांनी हजेरी लावली आहे.

दरम्यान, अक्षय कुमारचा ‘सरफिरा’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. डेक्कन एअरलाइन्स ज्या व्यक्तीने उभी केली, त्याच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. तमिळ भाषेत प्रदर्शित झालेला ‘सोरारई पोटरु’ या बायोपिकचा हा रिमेक आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर बॉलीवूड अभिनेत्री राधिका मदान ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगारा यांनी केले आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरुवातीच्या काळात आम्हाला एकमेकांची कामाची पद्धत समजून घेण्यात वेळ गेला, असे अक्षय आणि सुधा यांनी मुलाखतीदरम्यान कबूल केले होते. गेल्या काही दिवसांपासून अक्षय या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होता, यादरम्यानच तो आजारी पडला आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader