बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार हा त्याच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखला जातो. नुकताच अक्षयचा ‘मिशन राणीगंज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याचदरम्यान त्याने ‘इंडिया टूडे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही अक्षयने भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबरोबरच सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगलाही अक्षयने चोख उत्तर दिलं आहे. अक्षयवर बऱ्याचदा तो मोदी भक्त असल्याचा आरोपही सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असतो. मध्यंतरी अक्षय कुमारने मोदींची मुलाखत घेतली तेव्हाही त्याच्यावर टीका झाली होती. अक्षयने जेव्हा मोदींना आंबे आवडतात का? हा प्रश्न विचारला तेव्हाही अक्षयची लोकांनी खिल्ली उडवली.

आणखी वाचा : एसएस राजामौली कसे बनले देशातील सगळ्यात महागडे दिग्दर्शक? एका चित्रपटासाठी घेतात ‘इतके’ कोटी मानधन

याविषयी बोलताना अक्षय म्हणाला, “मला ते माणूस म्हणून कसे आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता होती. त्यामुळेच ते घडयाळ एका विशिष्ट पद्धतीनेच का घालतात? त्यांच्या बँकेत किती पैसे आहेत? असेच प्रश्न मी त्यावेळी त्यांना विचारले. मला त्यांना पॉलिसीजविषयी विचारायचंच नव्हतं.” त्यावेळी प्रधानमंत्री ऑफिसकडून अक्षयला प्रश्नांबद्दल काहीही सूचना देण्यात आलेल्या नसल्याचंही त्याने कबूल केलं.

याबरोबरच ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्याला मोदी भक्त म्हणून खिजवणाऱ्या लोकांबद्दल अक्षय म्हणाला, “मी टॉयलेट एक प्रेम कथामधून स्वच्छ भारतचं प्रमोशन केलं याचा आरोप बरेच लोक माझ्यावर लावतात अन् ते सत्य आहे, पण मी पॅडमॅन बनवला ते कोणाला दिसलं नाही. मी केलेला ‘एयरलिफ्ट’ची कथा ही कॉँग्रेस काळातील आहे, इतकंच नव्हे तर ‘मिशन राणीगंज’सुद्धा त्याच काळातील आहे याविषयी कुणीच बोलणार नाही. ते फक्त त्यांच्या सोयीनुसार त्यांना जे मांडायचं आहे ते मांडतात.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar dismisses modi bhakt tag says people conveniently tweak their narratives avn