बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. परेश रावल आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. आता ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा- “त्याने माझ्या छातीला पकडलं आणि…”, सोनम कपूरने सांगितलेला धक्कादायक प्रसंग
‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘ओह माय गॉड’ च्या पहिल्या भागात अक्षय कुमार कृष्णाच्या भुमिकेत दिसला होता. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही अक्षय देवाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. पोस्टरमध्ये अक्षयच्या लांब जटा दाखवण्यात आलं असून अंगाला भस्म फासलेलं दिसत आहे. या पोस्टवरुन अक्षय या चित्रपटात भगवान शिवची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळाली आहे.
‘ओह माय गॉड’ २०१२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार आणि परेश रावल यांची मुख्य भूमिका होती. मात्र, ‘ओह माय गॉड’च्या दुसऱ्या भागात परेश रावल यांच्या जागी पंकज त्रिपाठी भूमिका साकारणार आहे. परेश रावल यांनी या भूमिकेसाठी बाजारमूल्यापेक्षा अधिक रक्कमेची मागणी केली होती. अनेकदा प्रयत्न करुनही परेश रावल यांनी भूमिकेसाठी काहीही प्रतिसाद न दिल्याने अखेर पंकज त्रिपाठीला या चित्रपटाच्या मुख्य अभिनेता म्हणून घेण्यात आले.