‘ब्रह्मास्त्र’नंतर बॉलिवूड निर्माता करण जोहर हा तसा सोशल मीडियापासून बराच लांब आहे. काही कारणास्तव त्याने त्याचं ट्विटर अकाऊंट बंद केलं असलं तरी इतर प्लॅटफॉर्मवर तो सक्रिय आहे. नुकतंच त्याने त्याच्या धर्मा प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटाबद्दल मोठी अपडेट दिली आहे. या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर करण जोहरने शेअर केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांच्या ‘सेल्फी’ या चित्रपटाची चर्चा गेल्या वर्षापासून आहे. मध्यंतरी याचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. हे पोस्टर प्रेक्षकांना चांगलंच पसंत पडलं होतं. त्यानंतर याचा एक छोटा टीझरसुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. आता या ‘सेल्फी’चं नवं पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख करण जोहरने जाहीर केली आहे.

आणखी वाचा : Video : बॉलिवूडच्या ‘बेबो’चा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल; ‘या’ कारणामुळे नेटकऱ्यांनी केलं करीनाला ट्रोल

२४ फेब्रुवारी या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इम्रान हाश्मी आणि अक्षय कुमार ही कधीही न पाहिलेली जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक सुपरस्टार आणि त्याचा एक सुपरफॅन या दोघांवर बेतलेली असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या नव्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार आणि इम्रान यांच्या दोघांमधील खुन्नस आपल्याला बघायला मिळत आहे. हा एक कॉमेडी अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. याची निर्मिती करण जोहर आणि दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन या दोघांनी मिळून केलेली आहे. शिवाय राज मेहता यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. लवकरच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.