Selfiee Trailer : अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांच्या ‘सेल्फी’ या चित्रपटाची चर्चा गेल्या वर्षापासून आहे. मध्यंतरी याचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. हे पोस्टर प्रेक्षकांना चांगलंच पसंत पडलं होतं. त्यानंतर याचा एक छोटा टीझरसुद्धा आपल्याला पाहायला मिळाला होता. आता या ‘सेल्फी’चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’ या बॅनरखाली हा चित्रपट तयार झाला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमधून एक बॉलिवूड सुपरस्टार आणि त्याचा एक चाहता यांच्यातील एक वेगळंच नाट्य पाहायला मिळणार आहे. आपल्या आवडत्या स्टारबरोबर सेल्फी काढण्यासाठी आपल्या मुलाइतकाच उत्सुक असलेला चाहता केवळ एका सेल्फीसाठी नेमकं काय करतो जेणेकरून त्या सुपरस्टार आणि एका सामान्य फॅनमध्ये एकप्रकारचं वैर निर्माण होतं. यातून नेमकं काय निष्पन्न होतं आणि त्या चाहत्याला सेल्फी मिळतो की नाही यावर हा चित्रपट बेतलेला असल्याचं याच्या ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…

आणखी वाचा : करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मधून बाहेर पडण्याबद्दल कार्तिक आर्यनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

यामध्ये अक्षय कुमार हा सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे तर इमरान हाश्मी हा एका सामान्य चाहत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या दोघांमधील ही जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच उत्सुक आहेत. या चित्रपटात भरपूर ड्रामा, अॅक्शन, रोमान्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा ट्रेलर पाहून उत्सुकता नक्कीच ताणली गेली आहे.

याची निर्मिती करण जोहर आणि दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन या दोघांनी मिळून केलेली आहे. शिवाय राज मेहता यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत. यांच्याबरोबरच नुशरत भरूचा, डायना पेंटि या अभिनेत्रीसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २४ फेब्रुवारीला ‘सेल्फी’ प्रदर्शित होणार आहे. इम्रान हाश्मी आणि अक्षय कुमार ही कधीही न पाहिलेली जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Story img Loader