Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन जामनगरमध्ये मोठ्या धुमधडाक्यात झालं. या सेलिब्रेशनमध्ये हॉलीवूडसह बॉलीवूड कलाकार, क्रिकेटर्स, राजकारणी, उद्योगपती असे अनेक जण सामील झाले होते. १ मार्चला सुरू झालेला हा प्री-वेडिंग सोहळा ३ मार्चला, काल संपला.

पहिल्या दिवशी हॉलीवूड पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये बॉलीवूडचे सेलिब्रिटी थिरकताना पाहायला मिळाले. मग तिसऱ्या दिवशी ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर दुसऱ्या कार्यक्रमात सर्व पाहुणे भारतीय पेहराव्यात पाहायला मिळाले. सध्या संगीत सोहळ्यातील अक्षय कुमारच्या परफॉर्मन्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये रणबीर कपूर-आलिया भट्टचा आकाश अंबानी-श्लोका मेहतासह भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमधील संगीत सोहळ्यात अक्षय कुमारने जबरदस्त परफॉर्मन्स केला. लाइव्ह गात त्याने एनर्जेटिक असा डान्स केला; जो पाहून मुकेश अंबानी उठले आणि त्याला मिठी मारली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – Video: ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेचा सुरू होणार नवा अध्याय, सुमीत पुसावळेच्या जागी बाळूमामांच्या रुपात झळकणार ‘हे’ अभिनेते

दरम्यान, अक्षय व्यतिरिक्त बॉलीवूडचे तीन खानही अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमधील संगीत सोहळ्यात डान्स करताना पाहायला मिळाले. शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान ‘नाटू नाटू’ या गाण्यांवर नाचताना दिसले. त्यानंतर सारा अली खान, खुशी कपूर, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, मनिष मल्होत्रा, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अशा अनेक जणांनी डान्स केला. सध्या याचे व्हिडीओ चर्चेत आले आहेत.

Story img Loader