अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. उद्याच्या आगामी चित्रपटांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘हेरा फेरी ३’ मध्ये तो भूमिका साकारणार नाही हे कळताच अनेकजण नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे त्याचा पहिला मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ यालाही विरोध होताना दिसतोय. त्याच्या कामाबरोबर असतो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत असलेला पाहायला मिळतो. फक्त तोच नव्हे तर त्याची मुलंही चर्चेचा विषय बनत असतात. इतर स्टारकिड्सप्रमाणे अक्षयचा मुलगा कधी चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण अक्षय कुमारने याबद्दल आता एक खुलासा केला आहे.

अक्षय कुमारच्या मुलाबद्दल जाणून घेण्यासाठी अक्षय कुमारचे चाहते उत्सुक असले तरी त्याचा मुलगा मात्र या सगळ्या झगमगत्या दुनियेपासून लांब असतो. अक्षयचा मुलगा आरव याला चित्रपटसृष्टीत येण्यात अजिबात रस नसल्याचे अक्षय नुकतेच सांगितले आहे. आरवला प्रसिद्धीपासून दूर राहायला आवडते असेही अक्षय म्हणाला.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…

आणखी वाचा : महेंद्रसिंग धोनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज; ‘या’ चित्रपटात साकारणार महत्वपूर्ण भूमिका

‘हिंदुस्तान टाइम्स लीडरशीप समीट २०२२’ या कार्यक्रमात संवाद साधतांना तो त्याच्या लेकाबद्दल भरभरून बोलला. अक्षय म्हणाला, “मला माझ्या मुलाला विविध प्रकारचे चित्रपट दाखवायचे आहेत. तसंच चित्रपटांबद्दल काही गोष्टी शिकवत त्याला या क्षेत्राबद्दल जागरूक करायचे आहे. पण आरवला या कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाही. त्याचा कल फॅशन डिझायनिंगकडे आहे. त्यासोबतच त्याला अभ्यास करण्यात रस आहे. एकतर तो अभ्यास करेल नाहीतर तो फॅशन डिझायनिंग करेल, असे त्याने मला स्पष्ट सांगितले आहे.”

हेही वाचा : “…तर चित्रपट पाहणार नाही”; ‘हेरा फेरी’च्या निर्मात्यांवर प्रेक्षक नाराज

दरम्यान यावर्षी अक्षयचे ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतु’ आणि कटपुतली हे चित्रपट प्रदर्शित झाले. तर आता पुढलं वर्षी तो महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडाले सात’ या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसेल.

Story img Loader