दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा ‘हेरा फेरी’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही हा चित्रपट अनेकजण आवर्जून बघतात. अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत. अशातच आता या चित्रपटात कार्तिक आर्यनची एंट्री झाल्याचे नुकतेच समोर आले होते. या बातमीमुळे कार्तिकचे चाहते जरी आनंदी झाले असले तरी अक्षय कुमारचे चाहते नाराज झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेते परेश रावल यांना एका चाहत्याने विचारलं की, “सर कार्तिक आर्यन हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात दिसणार का?” यावर परेश रावल यांनी “हो. हे खरं आहे” असं उत्तर दिलं. त्यांच्या या ट्वीटने कार्तिक आर्यनच्या चाहत्यांना आनंद झाला तर अक्षय कुमारचे चाहते नाराज झाले आहेत. या चित्रपटात कार्तिक नको तर अक्षयलाच आणा अशी मागणी त्याचे चाहते करताना दिसत आहेत. ‘हेरा फेरी ३’ ची स्क्रिप्ट आवडली नाही अशी चर्चा माध्यमात आहे.

आणखी वाचा : “आमच्याकडे एक परफेक्ट बातमी आहे…”; पोस्ट शेअर करत रणदीप हुड्डाने चाहत्यांना दिले खास सरप्राईज

अक्षयच्या अनेक चाहत्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागात कार्तिकच्या ऐवजी अक्षयच हवा आहे अशी मागणी केली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘भूल भुलैय्या’ या अक्षयच्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटाचा दुसऱ्या भागात अक्षयच्या ऐवजी कार्तिक आर्यन दिसला. तसेच त्याआधी अक्षयने ‘वेलकम’ आणि ‘आवारा पागल दीवाना’च्या सिक्वेलही नकार दिला. प्रत्येक चित्रपटाच्या पुढील भागामध्ये अक्षयची जागा दुसऱ्या एका अभिनेत्याने घेतली.

‘हेरा फेरी ३’ मध्ये अक्षयची मागणी करताना एका नेटकऱ्याने लिहिले, “मला वाटतं कार्तिक आर्यन या चित्रपटात येणार ही बातमी खोटी आहे.” तर दुसऱ्या नेटऱ्याने लिहिले, “आता कार्तिकार्यांचे नाव समोर आणून नंतर अक्षय कुमार बरोबर एक मोठी घोषणा करण्याचा त्यांचा विचार असेल.” अजून एक नेटकरी ट्वीट करत म्हणाला, “अक्षय कुमार जर ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागात दिसणार नसेल तर आम्ही हा चित्रपट बघणार नाही.”

हेही वाचा : कार्तिक आर्यनचा ‘हा’ आगामी चित्रपट थिएटरमध्ये नाही तर, थेट प्रदर्शित होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

२०२१ मध्ये हेरा फेरी फ्रेन्चायझीच्या निर्मात्यांनी, फिरोझ नाडियादवाला यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी ‘हेरी फेरी ३’ ची घोषणा केली होती. या चित्रपटाबाबत संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar fans got disappointed by hera pheri producers decision rnv