अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकुटाचा २००० साली ‘हेराफेरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा चाहता वर्ग मोठा आहे. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्यंतरी चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. गेले अनेक महिने या चित्रपटावर निर्माते व दिग्दर्शक काम करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवाय मध्यंतरी यात अक्षय कुमारऐवजी कार्तिक आर्यन यात दिसणार असल्याच्या बातमीमुळेही चाहते चांगलेच नाराज झाले होते. आता अखेर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली असून यात अक्षय कुमारची पुन्हा एन्ट्री झाल्याने चाहते खुश झाले आहेत, शिवाय संजय दत्तसुद्धा या चित्रपटात एका धमाल भूमिकेत दिसणार असल्याचीही पुष्टी करण्यात आली आहे.

आणखी वाचा : राम चरणला करायचंय विराट कोहलीच्या बायोपिकमध्ये काम; अभिनेता म्हणाला, “मी बराचसा…”

सध्या मात्र सोशल मीडियावर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला विरोध होताना दिसत आहे. ‘हेरा फेरी ३’चं दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहे. फरहाद सामजी यांचे आधीचे चित्रपट आणि लेखन पाहता चाहत्यांना ते दिग्दर्शक म्हणून नको असल्याचं स्पष्ट होत आहे, यामुळेच फरहाद सामजी यांना ‘हेरा फेरी ३’मधून काढून टाकण्यात यावे याची मागणी सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

गेल्यावर्षी अक्षय कुमारचा सुपरफ्लॉप ठरलेला ‘बच्चन पांडे’ हा चित्रपटही फरहाद यांनीच दिग्दर्शित केला होता. एकूणच त्यांचे फ्लॉप चित्रपट लिखाण यामुळे त्यांना विरोध होताना दिसत आहे. फरहाद सामजी ऐवजी मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांना परत आणावं अशी मागणी लोक करत आहेत. फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा करण्यात आला आहे. मूळ ‘हेरा फेरी’ हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला होता.