अक्षय कुमारने गेल्या वर्षी दिग्दर्शक प्रियदर्शनबरोबरच्या बहुप्रतीक्षित सिनेमाची घोषणा करत चाहत्यांना खूश केले होते. अक्षय ‘भूत बंगला’ या त्याच्या आगामी चित्रपटाची जयपूरमध्ये शूटिंग करत आहे. याच सेटवर ‘मकरसंक्राती’ च्या निमित्ताने अक्षयने पतंग उडवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज, (१४ जानेवारी २०२५) , अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर मकरसंक्रांतीच्या सेलिब्रेशनची झलक शेअर केली. एका छतावर उभे राहून अक्षय पतंग उडवत होता, तर परेश रावल यांनी फिरकी पकडली होती.

हेही वाचा…आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…

अक्षयने काळा ट्रॅकसूट घातले होते, तर परेश रावल यांनी पांढऱ्या कुर्ता पायजमावर तपकिरी जॅकेट घातले होते. यावेळी दोन्ही अभिनेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, आणि ते सणाचा उत्साह व्यक्त करत होते.

अक्षयने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “भूतबंगला च्या सेटवर माझ्या जिवलग मित्र परेश रावल यांच्याबरोबर मकरसंक्रांतीचा उत्साह साजरा करत आहे! तुम्ही सतत हसावं, चांगल्या गोष्टींचा आनंद घ्यावा, आणि पतंगासारखं उंच भरारी घ्यावी यासाठी तुम्हाला शुभेच्छा! तुम्हा सगळ्यांना पोंगल, उत्तरायण आणि बिहूच्या शुभेच्छा.”

हेही वाचा…श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण

‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘भूत बंगला’ चे शूटिंग ‘भूल भुलैय्या’च्या पहिल्या भागातील लोकेशनवर म्हणजे जयपूरमधील ‘चोमू पॅलेस’ येथे होत आहे. या चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले, “टीम जयपूरमध्ये जवळपास एक महिना शूटिंग करणार आहे आणि ६० टक्क्यांहून अधिक चित्रपटाचे चित्रीकरण चोमू पॅलेसमध्ये होणार आहे. हा चित्रपट हॉरर आणि ह्युमरचा संगम आहे.”

हेही वाचा…बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”

‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमार, वामीका गब्बी, तब्बू, परेश रावल, आसरानी, आणि राजपाल यादव यांचा मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार, शोभा कपूर, आणि एकता आर. कपूर यांनी केली आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित हा चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar flies kites on the set of bhooth bangla with paresh rawal celebrates makar sankranti 2025 psg