मागच्या काही दिवसांपासून ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटावर निर्माते व दिग्दर्शक काम करत असल्याचं कळतंय. ‘हेरा फेरी’च्या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. आता प्रेक्षक तिसऱ्या भागाची वाट बघत आहेत. अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यनला या चित्रपटात कास्ट केल्याने आधीच प्रेक्षक नाराज आहेत. तर नुकतंच या तिसऱ्या भागात अक्षय दिसणार असल्याचं बोललं गेलं होतं. पण आता यामागील सत्य समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी गेल्या १० दिवसांत अक्षय कुमारबरोबरचे सर्व मतभेद दूर करण्यासाठी आणि त्याला फ्रँचायझीकडे परत आणण्यासाठी २ वेळा भेट घेतली होती. तसंच त्याला परत आणण्यासाठी फिरोज यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे अक्षयसाठी या चित्रपटाच्या कथेत थोडा बदल करण्यात येणार असल्याची बातमी समोर आलेली होती. पण त्या सर्व अफवा असल्याचं आता कळतंय.

आणखी वाचा : अक्षय कुमारने केली ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात; म्हणाला, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या…”

‘ई टाइम्स’च्या वृत्तानुसार अक्षय कुमारची गेल्या १० दिवसात एकदाही ‘हेरा फेरी ३’च्या निर्मात्यांशी भेट झालेली नाही. त्याचप्रमाणे ‘हेरा फेरी ३’मध्ये काम करायला तो अजिबात इच्छुक नाहीये. “अक्षयला अनीस बज्मी यांच्याबरोबर एक विनोदी चित्रपट करायचा आहे. पण तो चित्रपट ‘हेरा फेरी ३’ नाही,” असं अक्षयच्या एका जवळच्या व्यक्तीने ‘ई टाइम्स’ला सांगितलं.

हेही वाचा : ‘हेरा फेरी ३’च्या निर्मात्यांना मोठा धक्का; अनीस बज्मी यांनी धुडकावली चित्रपट दिग्दर्शनाची ऑफर, कारण देत म्हणाले…

अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाचा हा चित्रपट २००० मध्ये प्रदर्शित झाला होता. २००६ मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी २’ प्रदर्शित झाला. आता प्रेक्षक ‘हेरा फेरी ३’ची आतुरतेने वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar is not interested to work in hera pheri 3 rnv