२ दिवसांपूर्वी अक्षय कुमारची सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. यामध्ये तो काहीतरी वेगळं प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे असं म्हणताना आपल्याला दिसला. तो नेमकं काय घेऊन येणार आहे हे त्याने प्रेक्षकांनाही ओळखायला लावलं. अखेर ती गोष्ट समोर आली आहे. अक्षयने त्याच्या नव्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. एका शूर एंजिनियरच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पूजा एंटरटेनमेंट आणि अक्षय कुमार लवकरच प्रेक्षकांसमोर एका भारतीय नायकाचे शौर्य सादर करणार आहेत. अक्षय कुमार या आगामी चित्रपटामार्फत अभियंता जसवंत सिंग गिल यांची खरी जीवनकहाणी पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाला आहे. जसवंत सिंग गिल यांनी १९८९ मध्ये कोळश्याच्या खाणीत अडकलेल्या ६४ कामगारांना अत्यंत कठीण परिस्थितीतून वाचवले होते.

आणखी वाचा : “मी ब्राह्मण आहे आणि…” अनुपम खेर यांनी दिलेला दिग्दर्शक महेश भट्ट यांना शाप; कारण…

केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री – श्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर स्वर्गीय गिल यांचे स्मरण केले आहे. तसेच, पडद्यावर अशी आदरणीय भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याने भारावून गेलेल्या अक्षय कुमारने ट्वीट करत आपला आनंद व्यक्त करत म्हणाला, “या कथेसारखी दुसरी कथा नाही!”. या चित्रपटाचे दिग्दर्शन टिन्नू सुरेश देसाई करणार असून, यांनी यापूर्वी अक्षय कुमारबरोबर राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘रुस्तम’मध्ये काम केले आहे.

पूजा एंटरटेनमेंट हे, निर्माते वाशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सर्वात मोठे आणि अग्रणी चित्रपट निर्मिती संस्था आहे. अक्षय कुमारचा हा रिअल लाइफ रेस्क्यू ड्रामा चित्रपट २०२३ मध्ये दर्शकांच्या भेटीला येणार आहे. अजूनही या चित्रपटाचे नाव जाहीर झाले नसून प्रेक्षकांनी या चित्रपटासाठी उत्सुकता दर्शवली आहे.